भविष्य नेहमीच माणसांना आकर्षित करत आले आहे. शास्त्रज्ञांसह अनेक असे लोकही(prediction)आहेत ज्यांनी भविष्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यापैकी एक नाव आहे बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा, ज्यांना बाल्कनची नास्त्रेदमस असेही म्हटले जाते. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याने लोकांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.बाबा वेंगाच्या मते पृथ्वीवर एक असा अज्ञात व्हायरस पसरेल, ज्यामुळे माणूस झपाट्याने वृद्ध होऊ लागेल. या व्हायरसचा परिणाम इतका घातक असेल की तरुण वयातच लोक वृद्धावस्थेकडे वळतील आणि त्यांचे आयुष्य खूपच कमी होईल.

आज जेव्हा जग हवामान बदल, प्रयोगशाळेत तयार केलेले व्हायरस आणि जैविक युद्धाच्या भीतीशी झुंजत आहे, तेव्हा बाबा वेंगाची ही भविष्यवाणी आणखी भयावह वाटते. पण ही भविष्यवाणी कोणत्या वर्षात खरी ठरणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यावाणी 2088 सालासाठी आहे. (prediction)त्या वर्षात पृथ्वीर मोठे संकट येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक असा व्हायरस ज्यामुळे तरुण देखील वृद्ध दिसणार आहेत.

बाबा वेंगाचा जन्म 1911 मध्ये नॉर्थ मॅसेडोनियामध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव व्हॅन्गेलिया पांडेवा दिमित्रोवा होते. वयाच्या 12 व्या वर्षी एका वादळामुळे त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली.(prediction) वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच त्या भविष्यवाण्या आणि उपचार यासाठी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांची कीर्ती इतकी वाढली की बल्गेरियाचे राजा बोरिस तृतीय आणि सोव्हिएत नेते लिओनिद ब्रेझनेव यांसारखे दिग्गजही त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असत. त्यांचे निधन 1996 मध्ये झाले, तरी त्यांच्या भविष्यवाण्या आजही चर्चेचा विषय ठरतात.
हेही वाचा :
‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…
सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले
फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर