लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे.(E-KYC) लाडकी बहीण योजनेक आता सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करावी लागणार आहे. यासाठी दोन महिन्यांता कालावधी देण्यात आला आहे.अनेक महिलांना केवायसी केले आहेत. परंतु अनेक महिलांना केवायसी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. महिलांना ओटीपी किंवा तांत्रिक कारणांमुळे केवायसी करता येत नाहीये. यावरच आता आदिती तटकरेंनी उपाय काढला आहे.महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय केवायसी करण्यासाठी एक उपाय काढला आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे .महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची दखल घेण्यात आली आहे. (E-KYC)तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.
त्यामुळे आता लाडक्या बहिणींना केवायसी करताना ओटीपी किंवा तांत्रिक अडचणी येणार नाहीत. याबाबत लवकरच तोडगा काढला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही दिलासादायक बातमी आहे. लाडक्या बहिणींनी कोणत्याही अडचणीशिवाय केवायसी करता येणार आहे.(E-KYC)लाडकी बहीण योजनेच्या केवायसीबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी करण्यात येणार आहे. यातून महिलांच्या कुटुंबांच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
हेही वाचा :
‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…
सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले
फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर