पुण्यात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीचा झालेल्या अपघाताने मोठं वादळ निर्माण झालं आहे.(dancer) या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, रिक्षाचालकाच्या मुलीने पोलिसांवर गंभीर आरोप करत सांगितलं आहे की, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज लपवली जात आहे आणि गाडीतून उतरणाऱ्याचा चेहराही दाखवला जात नाहीये.

या प्रकरणानंतर वातावरण अधिकच तापलं असून, ठाकरेंची शिवसेना देखील या प्रकरणात आक्रमक झाली आहे. पक्षाने पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करत कारवाईची मागणी केली. याचदरम्यान, रिक्षाचालकाची मुलगी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पोहोचली आणि त्यांच्यासमोर तिने आपली व्यथा मांडली.(dancer)आता या प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी स्वतः थेट डीसीपींना फोन करून विचारलं, “गाैतमी पाटीलला उचलायचं की नाही?” ह्या फोन कॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून चर्चांना सुरवात झाली आहे. पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना थेट विचारलं की, जर गाैतमी पाटील गाडीत नव्हती तर मग अपघात घडवला कोणी? “भूत गाडी चालवत होतं का?” असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.

तसेच, त्यांनी अपघातात वापरलेली गाडी जप्त करण्यास सांगितले आणि गाडीची मालकीण गाैतमी पाटीलला नोटीस देण्याचे आदेश दिले. यासोबतच त्यांनी पोलिसांना स्पष्ट केलं की, (dancer)“त्या रिक्षाचालकाच्या मुलीला आधार द्या, तिचा खर्च तरी गाैतमी पाटीलकडून भरून घ्या.”पोलिसांनीही तातडीने हालचाल करत गाैतमी पाटीलला नोटीस बजावली आहे. ३० सप्टेंबरला घडलेल्या या अपघातानंतर प्रकरणाचा वेगाने पाठपुरावा सुरू असून, आता गाैतमी पाटीलला अटक होणार का? हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.गौतम पाटील अपघात प्रकरण केवळ कायदेशीर नाही तर राजकीय रंगही घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एका अपघातातून सुरुवात झालेला वाद आता राजकारण्यांच्या फोन कॉल्स, आंदोलनं आणि सोशल मीडियावरील चर्चांपर्यंत पोहोचला आहे. पोलिसांनी गाैतमी पाटीलला नोटीस बजावली असली तरी, अटक होणार का आणि जबाबदारी निश्चित कोणावर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

 ‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…

सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले

फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *