बुल्गेरियातील प्रसिद्ध भाकितं वर्तवणारे बाबा वेंगा यांनी त्यांच्या(scientists) भविष्यवाण्यांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. त्या दृष्टिहीन होत्या तरीही त्यांच्या अनेक भविष्यवाण्या इतक्या अचूक ठरल्या की त्यांची चर्चा आजही जगभरात केली जाते. 1996 साली त्यांचं निधन झालं मात्र त्यानंतरही त्यांच्या केलेल्या भाकितांनी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.2026 वर्षाबद्दलही बाबा वेंगा यांनी काही अशा भविष्यवाण्या केल्या आहेत ज्या काहीशा चिंताजनकही मानल्या जातात. या भाकितांमध्ये एलिएन्सशी संपर्क, विनाशकारी नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक संघर्ष यांसारख्या गंभीर घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामुळे भविष्यकाळात अनेक प्रकारच्या अडचणी आणि संकटांचा सामना मानवजातीला करावा लागू शकतो.

जरी अनेक लोक या भविष्यवाण्यांना फारसं गांभीर्याने घेत नसलं तरीही वेंगा यांची अनेक भाकितं खरी ठरली आहेत. म्हणूनच या भाकितांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही.(scientists) 2026 वर्षासाठी बाबा वेंगा यांनी केलेल्या काही प्रमुख भविष्यवाण्यांवर सविस्तर नजर टाकूया.बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये भूकंप तसंच ज्वालामुखीचे उद्रेक आणि पूर यांसारख्या मोठ्या नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या मते, पृथ्वीवर हवामानातील तीव्र बदलांसह विनाशकारी स्वरूपाच्या घटनांचा अनुभव येऊ शकतो. मोठमोठ्या ज्वालामुखींचे उद्रेक, तीव्र भूकंप आणि मुसळधार पावसामुळे निर्माण होणारे पूर यांचा परिणाम अनेक देशांना भोगावा लागू शकतो. अशा घटना लोकांनी केवळ ‘भविष्यवाणी’ म्हणून न पाहता ‘चेतावणी’ म्हणून गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.

बाबा वेंगा यांनी त्यांच्या भाकितांमध्ये तिसऱ्या महायुद्धाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मोठ्या राष्ट्रांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं त्यांनी सूचित केलंय. (scientists) यात रशिया आणि अमेरिकेसारख्या महासत्तांचा सहभाग असू शकतो. याशिवाय मध्य पूर्व, आग्नेय आशिया आणि दक्षिण आशियातील वाढता तणावही जागतिक पातळीवर गंभीर संघर्षाला कारणीभूत ठरू शकतो.एलियन्सशी संपर्क हा सध्या अशक्य गोष्ट वाटतेय. पण बाबा वेंगा यांच्या मते 2026 हे वर्ष या दृष्टीने ऐतिहासिक ठरू शकतं. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, मानव पहिल्यांदाच एलियन्सशी थेट संपर्क साधू शकते. त्यांनी पृथ्वीच्या वातावरणात एक मोठं अवकाशयान प्रवेश करेल, अशी भविष्यवाणी केली आहे.
हेही वाचा :
‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…
सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले
फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर