केंद्र सरकारने(government) दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात मोठी वाढ जाहीर केली आहे. यामुळे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिवाळीआधी मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचं वातावरण आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली होती. दिवाळी आणि सणासुदीच्या हंगामापूर्वी अर्थ मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाचव्या वेतन आयोगाने पगारदार कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 474टक्के केला आहे. पूर्वी, महागाई भत्ता 466 टक्के होता. याचा अर्थ केंद्र सरकारने 8 टक्के महागाई भत्ता दिला आहे. नवीन महागाई भत्ता 1 जुलै 2025 पासून लागू होईल. पाचव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर 2005 मध्ये संपला.
पुढील 10 वर्षांसाठी सहाव्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात आला, जो 2015 मध्ये संपला होता. सहाव्या वेतन आयोगांतर्गत, मूळ वेतनावरील विद्यमान महागाई भत्ता 252 टक्क्यांवरून 257 टक्के करण्यात आला आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकूण 5 टक्के वाढ होईल. हा बदल 1 जुलै 2025 पासून लागू होईल.

अलीकडेच, केंद्र सरकारने(government) सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ता 3 टक्के वाढवला, ज्याचा थेट फायदा सुमारे 49.19 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 68.72 लाख निवृत्तीधारकांना झाला. दिवाळी आणि सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवल्याची बातमी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा आणि आनंद देणारी ठरली आहे. भारत सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढवते आणि आपल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ देते.
हेही वाचा :
राजकारणात पुन्हा भूकंप, शिवसेना शिंदे गटाला मोठा हादरा
कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य
एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला