कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
एका रात्रीत गुंड तयार होत नाहीत. ती एक दीर्घ प्रक्रिया असते. दखलपात्र ते दखलपात्र आणि साधा गुन्हा एक गंभीर गुन्हा हा गुंडांचा प्रवास असतो. आणि या प्रवासात त्याला राजकारणी व पोलिसांची मदत होत असते. पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचे प्रकरण सध्या गाजते आहे. पोलिसांना(police) गंभीर गुन्ह्यात हवा असलेला हा गुंड परदेशात पसार झाल्यामुळे पोलीस प्रशासन ऐरणीवर आले आहे. परदेशात शिक्षणासाठी, नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, तरुणांना पासपोर्ट (पारपत्र) मिळवताना नाकी नव येतात. मात्र गुंडांना तो विनासायास मिळतो.निलेश घायवळ हा एका गंभीर गुन्ह्यात पुणे पोलिसांना वाॅ॑टेड आहे. पोलीस त्याच्या शोधात असताना तो कुठे सापडत नव्हता.तो पुण्याच्या बाहेर गेला असावा म्हणून इतरत्र शोध मोहीम राबवण्यात आली मात्र तो देशाबाहेर पसार झाला असल्याचे पुढे आले.

प्रदेशातच पळून जाण्यासाठी त्याने बनावट पासपोर्टचा वापर केला असावा असा संशय व्यक्त केला जात होता. तथापि सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात बनावट पासपोर्ट निघू शकत नाही. पासपोर्ट हा आधार कार्डला लिंक असतो.याचा अर्थ त्यालासनादशीर पासपोर्ट मिळाला आहे.पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया ही पोलीस प्रशासनाकडून केली जाते. त्यासाठी चारित्र्याचा दाखला आवश्यक असतो. तर मग निलेश घायवळ याला पासपोर्ट देण्याच्या आधीची प्रक्रिया पोलिसांनी(police) पार पाडली आहे आणि त्यासाठी त्यांनी विशेष मेहरबानी दाखवलेली दिसते. पोलिसांच्या सहकार्याशिवाय पासपोर्ट मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.गुंडांना, तस्करांना विनासायास पासपोर्ट मिळतात. हे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे. दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अबू सालेम, असे कितीतरी गँगस्टर पोलिसांच्या कडून मिळालेल्या पासपोर्टवरच परदेशात पळून गेले होते आणि आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पुण्यात आणि आसपासच्या परिसरात गुंडगिरी वाढली आहे. प्रवीण तरडे यांच्या”मुळशी पॅटर्न”या मराठी आणि हिंदी चित्रपटात गुंडगिरी चे भेदक चित्रण पाहायला मिळते. गजा मारणे, आळंदकर यांना मागे टाकणाऱ्या गुंडांच्या टोळ्या हाय दोस्त घालताना दिसतात. अलीकडच्या काही महिन्यात कोयता गॅंग ची दहशत प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे. काही महिन्यापूर्वी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी पुणे शहरातील सर्व नामचीन गुंडांना एकत्र बोलावून घेतले होते. पोलीस परेड ग्राउंड वर त्यांची ओळख परेड घेतली गेली होती. त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली होती. त्या वेळची या गुंडांची शरणागतीची भूमिका मीडियावर पाहायला मिळाली होती. पोलिसांच्या या ट्रीटमेंट मुळे पुण्यातील गुंडांची दहशत कमी होईल असे वातावरण पोलिसांनी तयार केले होते. प्रत्यक्षात मात्र गुंडांची दहशत कमी होण्याऐवजी ती वाढत चालली असल्याचे वास्तव आहे.
राजकारणी आणि पोलीस यांच्या सहकार्याशिवाय, आशीर्वादाशिवाय गुंडगिरी वाढवू शकत नाही. पोलिसांच्या रडारवर एखादा गुंडा आला की त्याच्या बचावासाठी स्थानिक नेते पोलिसांच्या वर दबाव आणतात. मग पोलिसांची पंचाईत होते. निलेश घायवळ प्रकरणात सुद्धा आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांना जबाबदार धरले आहे. घायवळ हा त्यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळेच निलेश घायवळ प्रसार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यासोबत काही गुंड असल्याचे छायाचित्र व्हायरल केले आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना तो जवळच्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये जायचा. पुन्हा सकाळी तो पोलीस ठाण्याच्या कस्टडीत दिसायचा. सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी तसेच ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. एकूणच पोलीस प्रशासनाच्या कर्तव्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आणि आता गुंड निलेश घायवळ याच्या प्रकरणातून ते अधिकच अधोरेखित झालेले पाहायला मिळते.
हेही वाचा :
दीपिका पदुकोणने बॉलीवूडच्या वर्क कॅल्चरचे उघड केले सत्य
सासूसोबत S*x केल्याचं पत्नीच्या माहेरी समजलं अन् त्याने पत्नीला…
माधुरी दीक्षितचं ‘हे’ गाणं दुरदर्शन, रेडियोवर केलेलं बॅन….