आपण रोज आपला दिवसभरातील काही वेळ सोशल मिडियावर देखील व्यतीत करत असतो. यावेळेस आपल्याला अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडिओ किंवा रील्स बघायला मिळतात. ज्यामध्ये अशा गोष्टी असतात की त्या पाहून आपण हसतो, कधी भावुक होतो तर कधी आपल्याला विचार(Nagaraj) देखील करायला लावतो. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेच्या तोंडातून चक्क साप बाहेर आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की तुम्ही गाढ झोपेत आहे आणि तुमच्या तोंडात साप शिरला आहे. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसत आहे त्यानुसार, हा साप महिलेच्या इतक्या आतमध्ये शिरला की डॉक्टरांना काढण्यासाठी प्रचंड महेनत करावी लागली.सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झोपलेल्या महिलेच्या तोंडात साप गेलेल्या दिसून येत आहे. गळ्यात साप गेला तेव्हा त्या महिलेस त्रास झाला. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्या सापाला महिलेच्या तोंडातून बाहेर काढले.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला रूग्णालयात दिसून येत आहे. डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. सापाला बाहेर काढण्यासाठी तिच्या तोंडात एक पाईप टाकण्यात आला आहे. महिलेय खूप त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर डॉक्टर अथक प्रयत्न करतात आणि सापाला बाहेर काढतात.हा व्हिडिओ @arojinle1 या अकाऊंटवर पोस्ट केला गेला आहे. दरम्यान हा साप महिलेच्या तोंडात कसा(Nagaraj) गेला आणि त्या महिलेला जाणवले कसे नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे मात्र समजू शकलेले नाही.

हेही वाचा :

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; उच्चांकी दरवाढीनंतर आधी स्वस्त झालं सोनं

‘फोन पे’ वरील Rent Payment ची सुविधा बंद

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *