रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट अॅग्रीगेटरसाठी दिलेल्या नव्या नियमांनंतर, फोनपे (PhonePe)आणि क्रेडसारख्या अॅप्सवर रेंट पेमेंटची सुविधा बंद करण्यात आली आहे. आधी भाडेकरू क्रेडिट कार्डद्वारे घरमालकाला थेट भाडं भरण्यास सक्षम होते, ज्यामुळे त्यांना रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक आणि ४५ दिवस व्याजमुक्त क्रेडिट मिळत असे. मात्र आता, RBIच्या नियमांनुसार, पेमेंट अॅग्रीगेटर्स केवळ नोंदणीकृत व्यापाऱ्यांशीच क्रेडिट कार्ड व्यवहार करू शकतात, आणि भाडेकरू घरमालक नोंदणीकृत व्यापारी नसल्यामुळे ही सुविधा बंद झाली आहे.

या बदलामुळे भाडेकरूंना भाडं भरण्याच्या पर्यायात अडचणी येत आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते, हा निर्णय मनी लॉंडरिंगचा धोका टाळण्यासाठी करण्यात आला आहे.सध्या मोबिक्विकसारख्या काही प्लॅटफॉर्मवर रेंट पेमेंटची सुविधा सुरु आहे, परंतु तिचा कालावधी निश्चित नाही. तसेच, क्रेडवर (PhonePe)उपलब्ध ट्यूशन फी पर्यायाद्वारेही घर भाडं भरण्याची सुविधा मिळते. भाडेकरूंना आता या पर्यायांचा वापर करून भाडं भरण्याचे मार्ग शोधावे लागणार आहेत.
हेही वाचा :
ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार
20 वर्षीय गतीमंद तरुणीवर अनेकांकडून लैंगिक अत्याचार
अजित पवारांची लाडक्या बहिणींना वॉर्निंग, ‘ही’ एक गोष्ट करावीच लागणार, अन्यथा….