१० ऑक्टोबर २०२५ ला आपण मानसिक आरोग्य दिन साजरा केला. आजच्या धावपळीच्या आणि गर्दीच्या वातावरणात नैराश्य आणि एकटेपणा मोठ्याप्रमाणावर वाढले आहे. या गंभीर समस्येवर जनजागृती करण्यासाठी भारतीय सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने हिंदी सिनेमा इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोणला मानसिक आरोग्यचे ब्रँड अँबॅसिडर घोषित केले आहे. दीपिका नेहमीच वाढत्या मानसिक(Mental Health) समस्यवर बोलताना दिसली आहे. तिने याआधी अनेक प्लॅटफॉर्म वर या समस्याच्या गांभीर्यवर बोलली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली गेली. दीपिकाने मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली असून ती म्हणाली की तिच्यासाठी मानाची आणि गौरवाची बाब आहे.

माणसाकडे असलेलं सर्वात जटिल आणि वेगळी गोष्ट म्हणजे त्यांचा मेंदू. आपण आज जी काही प्रगती केली आहे ती याच बुद्धीच्या बळावर केली आहे. पण जर हाच मेंदू तुमची अडचण बनली तर त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. सध्या जगातली सर्वात मोठी अडचण म्हणजे मानसिक आजार भारतात जवळपास २३० दशलक्ष लोक हे गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त आहेत.२०२२ मध्ये भारतात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या होत्या. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

एका संशोधनानुसार संशोधकांचे म्हणणे आहे की, कोविड १९ पेक्षाही मोठी आणि भयंकर लाट म्हणजेच मानसिक आजारांची लाट भविष्यात येणार आहे. अमेरिकेत प्रत्येक दोन व्यक्तीमध्ये एका व्यक्तीला (Mental Health)एकटेपणा वाटतो. हि एक वाढती गंभीर समस्या आहे. तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती अशा आजाराने ग्रस्त असतील तर काळजी घेणे महत्वाचे आहे.

मानसिक आजार हे बरे होऊ शकता होऊ शकतात, जर त्याच्यावर योग्य वेळी योग्य उपाय केले गेले म्हणून कोणताही न्यूनगंड मनात न ठेवता त्याची दाखल घ्यावी. आपण काय खातो, कोणते कपडे घालतो, कोणत्या प्रकारचा कन्टेन्ट पाहतो या सर्वच गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आपले खानपान व्यवस्थित करा.आपण काय खातो, कोणते कपडे घालतो, कोणत्या प्रकारचा कन्टेन्ट पाहतो या सर्वच गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो.

त्यामुळे आपले खानपान व्यवस्थित असणे ही प्रार्थमिक गोष्ट आहे. आपण काय खातो, कोणते कपडे घालतो, कधी झोपतो, कोणत्या प्रकारचा कन्टेन्ट पाहतो या सर्वच गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे आपले खानपान आणि झोप व्यवस्थित असणे ही प्रार्थमिक गोष्ट आहे. धकाधकीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम आणि योग करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. दिवसातला १ तास देऊन योग्य आणि ध्यान करणे मानसिक आरोग्यासाठी गरजेचे आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींनो १५०० रुपये खात्यात जमा झाले की नाही? अशाप्रकारे एका मिनिटात तपासा!

आरक्षणाच्या ‘त्या’ GR चा ठाकरे, शिंदेंना सर्वात मोठा फटका….

जिओची सुपरहिट ऑफर….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *