आई(mother) होण्याचं सुख जगातील सर्वात मोठं सुख मानलं जातं. ही आनंदाची आणि गोड बातमी समजते तेव्हा होणाऱ्या आई वडिलांसह कुटुंबातील प्रत्येक जण उत्साहाने आणि आनंदाने नाचू लागतं. येणारं बाळ हे मुलगा असो वा मुलगी ते निरोगी असावं असं प्रत्येकाची इच्छा असते. पण सोशल मीडियावर एका महिलेने तिने दिलेल्या बाळाबद्दल सांगितलं. त्यानंतर सर्वत्र तिची आणि त्या बाळाची चर्चा होत आहे. तिने सांगितलं की, त्या बाळाला जन्म दिल्यानंतर डॉक्टरही त्याला पाहून हैरान झाले होते.

सोशल मीडियावर शेल्बी मार्टिन या महिलेने आपल्या बाळाबद्दल सांगितलं आहे. शेल्बी ही अमेरिकेतील टेनेसी राज्यातील नॅशव्हिल शहरातील आहे. पहिल्यांदाच प्रेग्नंट झालेल्या शेल्बीने बाळ जन्मताच डॉक्टर आणि नर्सिंग (mother)स्टाफ बाळाला पाहून अक्षरशः थक्क झालेत. अमेरिकेतील टेनेसीमध्ये जन्मलेले बाळ सध्या चर्चेचा विषय बनला झालं आहे. शेल्बी मार्टिन नावाच्या या महिलेच्या पोटी जन्मलेलं बाळ तब्बल 5.8 किलोग्रॅम वजनाचं असल्याने रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसही आश्चर्यचकित झाले आहेत. डॉक्टरांनी सांगितल की, मेडिकल भाषेत 4.5 किलोपेक्षा जास्त वजनाच्या बाळांना ‘मॅक्रोसोमिक’ किंवा ‘जम्बो बेबी’ असं म्हटलं जातं.
शेल्बीनचं सी सेक्शन करायचा निर्णय झाला आणि ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं. मात्र बाळाचं वजन पाहून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी अचंबित होते. कारण सामान्य अमेरिकन नवजात बाळाचं वजन साधारण 7 पौंड असतं, पण या बाळाचं वजन 12 पौंड 14 औंस इतकं होतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार, अशा वजनदार बाळांचा जन्म सहसा आईच्या आरोग्यस्थिती, अनुवंशशास्त्र, गर्भधारणेचा कालावधी आणि गर्भावस्थेतील डायबेटिज यांसारख्या घटकांवर अवलंबून असतो.

दरम्यान जन्मानंतर बाळाला काही काळासाठी एनआयसीयू मध्ये ठेवण्यात आलं. तिथे ऑक्सिजन सपोर्ट आणि ब्लड शुगर लेव्हलची तपासणी करण्यात आली. काही दिवसांच्या उपचारांनंतर बाळाची तब्येत पूर्णपणे सामान्य झाली आणि आई-बाळ दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आलं. पण सध्या सोशल मीडियावर या बाळाची चर्चा सुरु आहे.
हेही वाचा :
सूनेच्या खोलीत 5 दिवस होता बॉयफ्रेंड,नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर…
साप आणि मांजर चक्क उंदरासाठी लढले, आणि पुढे काय झाले…Viral Video
धर्मेंद्र खरच हेमा मालिनींसोबत राहत नाहीत का? बॉबी देओलने प्रकरण स्पष्ट केले…