हिंदी चित्रपटसृष्टीत अॅक्शन आणि दमदार अभिनयाचा उल्लेख आला की अभिनेते(actor) धर्मेंद्र यांचं नाव लगेच लक्षात येतं. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. परंतु, फक्त त्यांच्या चित्रपटांपुरतंच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक जीवनातील घटनाही नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. धर्मेंद्र यांची प्रेमकहाणी हेमा मालिनी सोबत खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून एकत्र संसार थाटला आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली.

त्यांच्या जोडीने अनेक चाहत्यांचे हृदय जिंकले. त्यांच्या मुलांपैकी सनी देओल आणि बॉबी देओल यांनी देखील इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि वडिलांच्या छायेखाली त्यांच्या करिअरची सुरुवात केली. अलीकडेच बॉबी देओलने ‘एबीपी लाईव्ह’शी बोलताना आई-वडिलांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चा होती की धर्मेंद्र हेमा मालिनींसोबत राहत नाहीत, काही सोशल मिडिया पोस्टनंतर ही अफवा अधिकच पसरली होती.
‘माझे आई-वडील दोघेही एकत्रच राहत आहेत. सध्या ते खंडाळा येथील आमच्या फार्महाऊसवर आहेत. तुम्हाला माहित आहेच, पप्पांचा स्वभाव थोडा फिल्मी आहे, पण त्यांना फार्महाऊसवर राहायला खूप आवडतं. त्यांचं वय लक्षात घेता, तिथे राहणं त्यांच्यासाठी आरामदायी आहे. हवामान छान आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. तो पुढे म्हणाला: ‘माझे बाबा खूप भावनिक आहेत. त्यामुळे ते आपले विचार व्यक्त करायला आवडतात.

जर मी कधी विचारलं की हे जे काही लिहिलं किंवा म्हटलंय ते का करतात, तर ते फक्त त्यांच्या मनाचं ऐकतात.’ या खुलाश्यानंतर चाहत्यांमध्ये धर्मेंद्र-हेमा(actor) मालिनीच्या वैयक्तिक जीवनाबद्दल उत्सुकता वाढली आहे. बॉबीच्या या स्पष्ट उत्तरामुळे अनेक अफवा दूर झाल्या आहेत. कामाच्या बाबतीत, बॉबी सध्या ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहे.
या प्रोजेक्टमध्ये त्याने एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून चाहत्यांकडून त्याच्या अभिनयाला भरभरून कौतुक मिळत आहे. बॉबीच्या अभिनयामुळे ही सीरिज सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी, त्यांच्या कुटुंबीयांसह आणि कामाच्या क्षेत्रातली प्रगती, यामुळे मराठी आणि हिंदी मनोरंजन चाहत्यांसाठी नेहमीच प्रेरणादायक ठरते.
हेही वाचा :
कपडे बदलताना आत शिरला, नंतर मुलीने….
विराट IPL 2026 मधून बाहेर पडला? RCB ला म्हणाला, ‘माझ्याशिवाय…
गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, केक कापला, नंतर जे घडलं ते…