देशातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी(ration card) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नागरिकांना स्वस्त किंवा मोफत अन्नधान्य मिळते, पण आता रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर रेशन कार्डधारकांनी केवायसी केली नाही, तर त्यांना मोफत अन्नधान्य मिळणार नाही.सरकारच्या नवीन नियमांनुसार, रेशन कार्डधारकांना दर पाच वर्षांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. अनेकांनी शेवटी 2013 मध्ये केवायसी केले होते, आणि त्यानंतर काही वर्षे ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ज्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही, ते आता ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

घरबसल्या ई-केवायसी करण्याची पद्धत:
मोबाईलवर मेरा केवायसी किंवा आधार फेस आयडी अॅप डाउनलोड करा. नंतर तुमचे पत्ता व रहिवासी माहिती भरा. आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड टाका आणि OTP द्वारे वेरिफाय करा. फेस ई-केवायसी पर्याय निवडा आणि कॅमेरा उघडून फोटो क्लिक करा. फोटो सबमिट करताच तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

केवायसी पूर्ण झाले आहे की नाही कसं तपासायचं:
मेरा केवायसी अॅपमध्ये प्रवेश करा, पत्ता व आधार क्रमांक, कॅप्चा व OTP भरा. जर Y दिसत असेल तर केवायसी पूर्ण झाली आहे; N दिसल्यास ती पूर्ण नाही.ऑफलाइन पद्धतीसाठी, जवळच्या रेशन दुकान किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन केवायसी करु शकता. त्यासाठी रेशन कार्ड (ration card)आणि आधार कार्ड सोबत घेऊन जा.

हेही वाचा :

अखेर उच्च न्यायालयाकडून केली गेली जबाबदारी निश्चित

हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी Video Viral…

कपडे बदलत असताना मुलीचा बनवला व्हिडीओ, ब्लॅकमेल करत…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *