पश्चिम बंगाल येथून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका मुलीचे कपडे बदलत असताना व्हिडीओ बनवला आणि ब्लॅकमेल(blackmailing) केल्याचे समोर आले आहे. हे धक्कादायक कृत्य एका लोकप्रिय युट्यूबरने आणि त्याच्या मुलाने केल्याचं आरोप आहे. पीडित मुलगी ही त्यांना रील बनवण्यास मदत करत होती. पीडित मुलगी ही अल्पवयीन असून १५ वर्षाची आहे. तर युटूबरच नाव अरबिंदा मंडल असे असून याचे लाखोंमध्ये फॉलोअर्स आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही युटूबरला रील बनवण्यात मदत करत होती. त्यावेळी ती कपडे बदलत असताना दोघांनीही व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल(blackmailing) करण्यास सुरुवात केली. मुलीने तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकाराची आणि छळाची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर कुटुंबियांनी लैंगिक अत्याचाराबाबतची माहिती समजली. संबंधित प्रकरणात अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, परंतु अधिक माहिती देण्यात आली नाही.
आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या युटूबरला न्यायालयात नेण्यात आले असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नंतर त्या मुलाला बालसुधागृहात पाठवण्यात आले आहे. दोघांनीही मुलगी कपडे काढतांना व्हिडीओ शूट केला आणि नंतर तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला.मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, वडील मुलाने काही महिन्यांपूर्वी पीडित मुलीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला एक शॉर्ट फिल्म बनवण्याबाबत मदत करण्यास सांगितली होती आणि त्यानंतर मुलगी याच कामानिमित्त अनेक ठिकाणी गेली होती.
हेही वाचा :
खात्यात पैसे आले नाही तर चूक सरकारची नाही, लाभार्थी महिलेची…
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर…
आजोबाकडून १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार…