शिक्षण क्षेत्रात मोठी पदभरती! प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

राज्यातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात लवकरच 5500 प्राध्यापक आणि 2900 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती(recruitment ) होणार आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ही भरती सार्वजनिक विद्यापीठे, अशासकीय अनुदानित महाविद्यालये, तसेच तंत्रज्ञान विद्यापीठे आणि शासन अनुदानित संस्थांमधील रिक्त पदांसाठी (recruitment )केली जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या कार्यक्रमात केली.

तंत्रज्ञान विद्यापीठांसाठी विशेष तरतूद :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठासाठी 105 अध्यापन पदांना मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठासाठी 8 कोटी रुपये दैनंदिन आणि प्रशासकीय खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठासाठी 603 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे.

अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या 5012 पदांची भरतीही करण्यात येणार आहे. तसेच व्ही.जे.टी.आय मुंबई आणि श्री गुरूगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड यांच्यासह इतर संस्थांमध्ये 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे.

दर्जा उंचावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न :
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, “2029 पर्यंत सर्व विद्यापीठांनी आपला शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे.” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जागतिक क्रमवारीत स्थान उंचावले असून, पुढील पाच वर्षांत हे विद्यापीठ जगातील टॉप 500 मध्ये स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे आणि सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यापीठ आणि संशोधन केंद्र सुरू करण्याची गरज मांडली. प्रशिक्षित शिक्षकांची भरती आणि भौतिक पायाभूत सुविधा वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :