राजगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात घडलेल्या एका थरारक प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी या खूनप्रकरणाचा छडा लावत तिघांना अटक केली आहे.मृत व्यक्तीचे नाव कृष्णा नामदेव खंडवी(husband) (वय 23, रा. गौळवाडी, पेण) असे असून, त्याच्या पत्नीनेच प्रियकर आणि मैत्रिणीसोबत कट रचून त्याची हत्या केली असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नी दिपाली (वय 19) हिने आपल्या प्रियकर उमेश सदु महाकाळ (वय 21) आणि त्यांची मैत्रीण सुप्रिया चौधरी (वय 19) यांच्या मदतीने कृष्णाची हत्या केली. या तिघांनी संगनमत करून इन्स्टाग्रामवर “पायल वारगुडे” नावाचे बनावट खाते तयार केले आणि कृष्णाशी संपर्क साधला.
“पायल वारगुडे” या बनावट खात्यावरून कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावण्यात आले. त्यानंतर तिघांनी त्याला गोड बोलून वासगावच्या जंगलात नेले आणि तेथे ओढणीने गळा आवळून खून केला. मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून आरोपींनी चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले, तसेच मोबाईल फोन फोडून पुरावे नष्ट केले.या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसतानाही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकाने केली.या घटनेनंतर रायगड पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींवर (husband)विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा माहिती आढळल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
“मी दोन वेळा गरोदर असतानाही काम…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने दीपिका पदुकोणला सुनावलं
आजचा गुरूवार ‘या’ राशींसाठी गेमचेंजर….
लाडक्या बहिणींच्या अडचणी थांबता थांबेना; कधी इंटरनेट तर कधी OTP च येईना..