अहिल्यानगर शहरातील उपनगर तपोवन रोडवर दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर संतापजनक घटनेची नोंद झाली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी सोडताना मुलगी एकटी असल्याचे पाहून स्कूलबसच्या(school bus) ड्रायव्हरने तिच्या विनयभंगाचे घाणेरडं कृत्य केले. ही घटना समोर आल्यानंतर नगरकरांनी राग व्यक्त करत चालकाला बेदम चोपला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनास्थळी पालक व नागरिकांनी जमाव तयार करून चालकाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. चालकाचे नाव बाळू दादा वैरागर असून, त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात चालकाविरोधात विनयभंग, धमकी आणि पोस्को कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.

या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये पालकांमध्ये भीतीचे(school bus) वातावरण निर्माण झाले असून, शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी योग्य कारवाई करत चालकाविरोधात त्वरित तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

‘कोणाच्या बापात हिंमत नाही…’, सेटवर उशिरा जाण्याबद्दल गोविंदाने दिले स्पष्टीकरण

पुढील 72 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा…

हिरोकडं S*x ची मागणी! अनुभव सांगताना म्हणाला, ‘दिग्दर्शकाने रुममध्ये…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *