स्मृती इराणी सध्या बऱ्याच वेळा चर्चेत असते, त्यांनी अशातच अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे. दरम्यान त्यांनी दीपिका पदुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मुद्द्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. हिंदी मालिकाविश्वाचा एकेकाळच्या लोकप्रिय अभिनेत्री स्मृती इराणी यांनी मोठे वक्तव्य केलं आहे(pregnant).

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला याच वर्षी मुलगी झाली आहे. आणि तीचं नाव दुआ असं ठेवण्यात आलंय. आणि मुलगी झाल्यानंतर दीपिका पदुकोणने मुलीला वेळ देण्यासाठी ८ तास काम करण्याच्या मुद्द्यावर भर दिला आहे. तेव्हापासूनच हा चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देत मत व्यक्त केले आहे.
या निर्णयानंतर दीपिका पदुकोण चर्चेत असून तिला यामुळे नुकसानही झालंय. संदीप रेड्डी वांगासोबत ती स्पिरिट या चित्रपटावर काम करत होती. परंतु, या निर्णयानंतर तिला या चित्रपटात काम करता आलं नाही तसेच गरोदर(pregnant) असताना कल्की मंडे काम केल्यानंतर कल्कीच्या दुसऱ्या भागातही ती होती परंतु वेळेच्या अभावामुळे तिला या चित्रपटातून देखील माघार घ्यावी लागली.
आता यावर प्रतिक्रिया देताना स्मृती इराणी म्हणाल्या, “मला असं वाटतं की, एक इंडस्ट्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपण इंडस्ट्री मार्केट व्हॅल्यू वाढवण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे . मला असं वाटत की, इंडस्ट्रीत कायमच फक्त सर्जनशीलतेला अधिक महत्व दिलं जातं आणि मार्केट व्हॅल्यूकडे तितकं लक्ष दिलं जात नाही.”

पुढे त्यांनी ८ तास काम करण्याच्या मागणी बद्दल बोलताना सांगितलं की हा वैयक्तिक निर्णय आहे. आणि त्यांना यात पडायचं नाहीये, तसेच ” मी फक्त एवढच सांगेन कि, मी दोन वेळा गरोदर असताना काम केलं आहे. मी माझ्या निर्मात्यांना यश मिळावं यासाठी खूप प्रयत्नशील असायचे. कारण मला ती कलाकार म्हणून माझी जबादारी वाटते.
“मला आज हे पूर्णपणे समजले आहे की, जर मी सातत्यानं माझ्या निर्मात्याला पाठिंबा दिला नाही , तर त्या दिवशी १२० जणांना पगार मिळत नाही. म्हणजेच १२० कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मी आता माझ्या कामाकडे आणि माझ्या कामाच्या जबाबदारीकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टीने पाहते.” असं देखील त्या म्हणाल्या.
हेही वाचा :
न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पक्षकाराने जीवन संपवले…
कोल्हापुरात वेश्या अड्ड्यावर छापा….
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, थेट टॉप 10 मधून…