अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Court)दोन दशकापूर्वी एका गुन्ह्यात अडकलेल्या आरोपी पतीला निर्दोष सोडले आहे. 15 वर्षांहून अधिक वयाच्या अल्पवयीन पत्नीशी वैवाहिक नात्यानंतर शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने या आधारे 2007 मध्ये दिलेली एकाची शिक्षा रद्द केली आहे.

आरोपी पतीवर आरोप होता की, 16 वर्षांच्या मुलीला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यासोबत शाररिक संबंध प्रस्थापित केले. सत्र न्यायालयाने आरोपीला कलम 363 (अपहरण), 366 (जबरदस्तीने विवाहासाठी प्रवृत्त करणे) व 376 (बलात्कार) कलमान्वये दोषी ठरवले होते. मात्र न्यायालयाने आधीचा निर्णय रद्द करत म्हटलं आहे की, जेव्हा घटना घडली तेव्हा पीडिता 16 वर्षांहून अधिक वय होते. तसंच, दोघांमध्ये निकाह झाल्यानंतर संबंध निर्माण झाले.
2005मध्ये आरोपी इस्लाम उर्फ पलटूविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याने 16 वर्षांच्या किशोरवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत निकाह केला. मात्र आरोपीने कोर्टात (Court)म्हटलं होतं की, त्याने 29 ऑगस्ट रोजी कथित पीडितेसोबत निकाह केला आणि निकाहनामा कोर्टातदेखील प्रस्तुत केला होता. दोघंजण काही काळ कालपी आणि भोपाळमध्ये भाड्याच्या घरात पती-पत्नी म्हणूनही एकत्र राहिले होते.मात्र सत्र न्यायालयाने मुलगी अल्पवयीन असल्याचा ठपका ठेवत त्याला दोषी ठरवले होते. कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि चार हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. आरोपी पतीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
न्यायमूर्ती अनिल कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ‘इंडिपेंडंट थॉट विरुद्ध युनियन ऑफ इंडिया’ (2017) या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 375 मधील अपवाद क्र. 2 चे स्पष्टीकरण बदलले होते. या अपवादात 15 वर्षापेक्षा अधिक वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणे. हा बलात्कार ठरत नाही, असे म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये ते बदलून ’18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पत्नीशी’ असे स्पष्ट केले. हा बदल फक्त भविष्यात लागू होईल, असा स्पष्ट आदेश दिला होता. त्यामुळे2017पूर्वी घडलेल्या घटनांवर तो लागू होणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
हेही वाचा :
दीपिका पदुकोण बनली Meta AI चा नवा आवाज…
हवामान खात्याचा पावसाचा इशारा…
सोनाक्षी सिन्हा खरंच आहे प्रेग्नेंट?