दिवाळीच्या अगदी आधी गुजरात मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाला आहे. रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व 16 मंत्र्यांनी राजीनामे (resign)दिले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी रात्री 8 वाजता सर्व मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी परत बोलावलं आहे. नवीन मंत्र्यांचा शपथविधी शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. गांधीनगर येथील महात्मा मंदिरात केंद्री गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

गुजरात सरकारमधील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ फेरबदल अखेर झाला आहे. वृत्तानुसार, मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांऐवजी तरुण आणि नवीन नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. राज्य सरकारला तीन वर्षं पूर्ण होत असतानाच हा बदल केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काही महिन्यांपूर्वीच मंत्रिमंडळात फेरबदल होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळी नवीन मंत्र्यांची नावे जाहीर केली जाऊ शकतात. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांची भेट घेतील आणि त्यांना पक्षाच्या राज्य संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. यामुळे पक्ष आणि सरकारमधील समन्वय मजबूत होईल. भाजपने अलीकडेच जगदीश विश्वकर्मा यांची गुजरातचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. “एक व्यक्ती, एक पद” या तत्त्वानुसार, विश्वकर्मा यांनी राज्य सहकार विभागाच्या मंत्रिपदाचा राजीनामा (resign)दिला असावा.

हेही वाचा :

६० कोटींच्या अटीवर शिल्पा शेट्टीने घेतली माघार, उच्च न्यायालयाला दिले उत्तर..
प्रवासदरम्यान महिलेला प्रसुती कळा, मराठी तरुणाने रेल्वे स्थानकावर केली डिलिव्हरी Video Viral
महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्वला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०



By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *