दिवाळी जवळ आली आहे आणि अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून मिळणाऱ्या गिफ्टची आणि बोनसची आतुरताही लागून राहिली आहे. काही लोक नेहमीप्रमाणे भेटवस्तू(gifts) न मिळाल्यास दुःखी होतील, तर काही जण फक्त मिठाईच्या डब्यावर समाधानी मानत आहेत. अशातच एक कंपनीचा व्हिडिओ सध्या संपूर्ण इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. यात कंपनीने कर्मचाऱ्यांना असे काही गिफ्स देऊ केले आहेत, जे पाहून सर्वांचे डोळे खुलेच्या खुले राहिले. लोकांनी हे व्हिडिओ वेगाने शेअर केले आणि कमी वेळातच याला लोखोंच्या घरात व्यूज मिळाल्या. चला तर मग व्हिडिओमध्ये नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडिओमध्ये ऑफिसमधील काही दृश्ये दिसून येत आहेत. बॅग्राऊंडला दिवाळीचं गाण वाजवण्यात आलं असून यात संपूर्ण कंपनीचे दृश्य दिसून येत आहे. ऑफिसमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डेस्कवर एक भलीमोठी बॅग गिफ्ट म्हणून ठेवली आहे. यासोबत एक मिठाईचा बाॅक्स (gifts)इथे ठेवण्यात आले आहे. यासोबतच प्रत्येक बॅगवर एक सुंदर दिवा देखील ठेवण्यात आला आहे जो या सरप्राईज दिवाळी गिफ्टला आणखीन आकर्षक बनवत आहे. अनेक कंपन्या ज्या कर्मचाऱ्यांना सोनपापडीसारखी साधी मिठाई गिफ्ट करतात. पण दुसरीकडे या कंपनीने कर्मचाऱ्यांना भेट केलेले हे सुंदर गिफ्ट्स आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गिफ्ट्स पाहून अनेक यूजर्सने कंपनीमध्ये जाॅईन होण्याचीही इच्छा दर्शवली.
हा व्हायरल व्हिडिओ @amazor_talks_mb नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावा ही नक्की कोणती कंपनी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फक्त कंपनीच नाव सांगा, लगेच जाॅईन करतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “रिक्त जागा असतील तर मला सांगा”.
हेही वाचा :
१ महिन्याच्या बाळावर दुर्मिळ बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशनची प्रक्रिया..
धावत्या स्कूल बसमध्ये दहावीच्या मुलीचा विनयभंग, ड्रायव्हरच लाजिरवाणे कृत्य
कोल्हापूरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा…