नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पतीला अनैतिक(relationship) संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केला, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियांका भगत नावाची महिला आणि तिचा प्रियकर शेख रफीक यांना पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दीड महिन्यांच्या तपासानंतर हा खून उघडकीस आला.

प्रथमदर्शनी तपासानुसार, किशन भगत यांचा मृत्यू त्यांच्या पत्नी आणि प्रियकराच्या(relationship) कटयोजनेतून झाला. 29 ऑगस्ट रोजी किशन भगत गायब असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल झाली होती, ही तक्रार प्रियांका भगत यांनीच दिली होती. तपासादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैनगंगा नदीत अनोळखी मृतदेह आढळून आला, जो नंतर किशन भगत यांचा असल्याचे निश्चित झाले.
पोलीस तपासात मोबाईल कॉल रेकॉर्डींग आणि इतर पुराव्यांवरून खुनाची सविस्तर योजना उघड झाली. पतीला दारूच्या नशेत पैनगंगा नदीच्या पुलावरून जिवंत फेकून दिल्याचे समोर आले. या घटनेनंतर नांदेड परिसरात संतापाची लाट उडाली असून पोलिस पुढील तपास व न्यायालयीन कारवाई करत आहेत.
हेही वाचा :
६० कोटींच्या अटीवर शिल्पा शेट्टीने घेतली माघार, उच्च न्यायालयाला दिले उत्तर..
प्रवासदरम्यान महिलेला प्रसुती कळा, मराठी तरुणाने रेल्वे स्थानकावर केली डिलिव्हरी Video Viral
महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्वला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०