हुपरीच्या पट्टणकोडोली परिसरातील श्री विठ्ठल बिरदेव देवाच्या यात्रेवेळी महिलांच्या अंगावरील लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने(Jewellery) चोरीस गेले. घटनाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फक्त पाच महिलांनी सुमारे ४ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार हुपरी पोलिसांत नोंदवली आहे.

रविवारी यात्रेच्या निमित्ताने फरांडेबाबांची भाकणूक पार पडली होती. या यात्रेत विविध राज्यांतून लाखो भाविक उपस्थित होते. गर्दीचा गैरफायदा घेत काही चोरट्यांनी महिलांच्या मणिमंगलसूत्र, बांगड्या, कर्णफुले इत्यादी महागड्या दागिन्यांवर(Jewellery) डल्ला मारला. यापैकी नीलाबाई रावसो पाटील (वय ६०, रा. कसबा सांगाव, ता. कागल) यांच्यासह पाच महिलांनी फिर्याद दाखल केली आहे.

घटनेनंतर काही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, परंतु किरकोळ कारवाई करून सोडून दिल्याचा आरोप पीडितांकडून करण्यात आला आहे. तसेच, फिर्यादी महिलांना हुपरी आणि पट्टणकोडोलीच्या पोलिस ठाण्यांमध्ये एकापाठोपाठ एक चकरा मारायला लावल्याची तक्रारही उभी राहिली आहे.या घटनेमुळे यात्रेतील भाविकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाकडून सुरक्षा वाढविण्याची आणि चोरीसंबंधी गंभीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना…
उद्धट पोरगं म्हणून हिणवणाऱ्यांना क्रिकेटरने सुनावलं, म्हणाला ‘अरे तो फक्त…’
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच निधन….