बॉलीवूडची फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा खटला सुरू आहे. हा खटला मुंबई उच्च न्यायालयात(High Court) प्रलंबित आहे. अलिकडेच न्यायालयाने या जोडप्याला देश सोडून जाऊ नये असे आदेश दिले आहेत. या जोडप्याने न्यायालयात युक्तिवाद केला की त्यांना कामासाठी लॉस एंजेलिस आणि इतर परदेशात जावे लागते. यामुळे न्यायालयाने शिल्पाला एक अट घातली, ज्यामुळे आता ती अडचणीत आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना परदेशात जाण्यापूर्वी ६० कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित एफआयआर संदर्भात त्यांच्याविरुद्ध जारी केलेला एलओसी रद्द करण्यासाठी या जोडप्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. आता याप्रकरणी अभिनेत्रीने स्वतःचे मत मांडले आणि मोठा निर्णय दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाला कळवले आहे की तिने तिचा नियोजित परदेश दौरा रद्द केला आहे. तिने सांगितले की न्यायालयाकडून परवानगी नसल्यामुळे तिने हा दौरा रद्द केला आहे. लुकआउट नोटीस रद्द करण्याच्या प्रकरणावर दोनदा सुनावणी झाली आणि दोन्ही वेळा न्यायालयाने शिल्पा शेट्टीला दिलासा देण्यास नकार मिळाला आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की उद्योगपती दीपक कोठारी यांनी अलीकडेच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला दाखल(High Court) केला आहे. कोठारींचा दावा आहे की शिल्पा शेट्टीने तिच्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी ₹७५ कोटींचे कर्ज घेतले होते, परंतु व्याजदरांमुळे ते वैयक्तिक गुंतवणूक म्हणून घेण्यास सांगितले. तिने कोठारींना आश्वासन दिले की ती मासिक व्याज देईल, परंतु शिल्पाने ते पैसे व्यवसायात गुंतवण्याऐवजी वैयक्तिक खर्चावर खर्च केले आणि नंतर कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला.
यानंतर दीपक कोठारी यांनी वारंवार अभिनेत्रीच्या परतफेडीची मागणी केली, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांनी या जोडप्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला. या सर्वांमध्ये शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली यांचे एक वाक्य शेअर केले आहे. जे आता चर्चेत आले आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भाजपनेच टाकलं जाळं…
दिवाळीत BSNL चा बंपर प्लॅन! फक्त 1 रुपयात सिम आणि 30 दिवस मोफत सेवा!
कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, “व्हॅकेन्सी आहे का?”; Video Viral