‘कौन बनेगा करोडपती 17’ मध्ये सहभागी झालेला एक छोटा स्पर्धक सध्या टीकेचा धनी झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासमोर उद्धटपणे वागल्याने इशित भट्टवर टीका (Cricketer)होत असताना, भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्तीने त्याच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथील पाचवीत शिकणाऱ्या इशित भट्टला वरुण चक्रवर्तीने जोरदार पाठिंबा दिला आहे. इशित भट्टला अलीकडेच प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्याच्या आत्मविश्वासू आणि उद्धट वर्तनामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर प्रचंड टीका झाली.

इशितचे ‘कौन बनेगा करोडपती 17’ मधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्याहल झाले आहेत. यामध्ये तो अमिताभ बच्चन बोलत असताना वारंवार त्यांना थांबवत असताना दिसत आहे. तो अमिताभ यांना सांगतो की, “मला आता तुम्ही नियम समजावत बसू नका”. तसंच अरे पर्याय द्या असंही बोलताना दिसत आहे. तसंच एका प्रश्नाच्या उत्तरावर एक नाही, चार लॉक लावा असंही म्हणतो.

इशितचा अतीआत्मविश्वास अनेकांना पटला नाही. नेटकऱ्यांनी त्याच वागणं आदरपूर्वक नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. इशितने रामायणासंदर्भात दिलेलं उत्तर चुकल्यानंतर ही टीका आणखी तीव्र झाली. याच प्रश्नावर त्याचं उत्तर चुकलं आणि त्याला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. मुलगा इतका उद्धट वागत असतानाही अमिताभ यांनी अत्यंत संयमीपणे परिस्थिती हाताळल्याने त्यांचंही कौतुक होत आहे. कधीकधी मुलं अती आत्मविश्वासात चूक करतात असं सांगत अमिताभ यांनी परिस्थिती हाताळली.
इशितवर ऑनलाइन टीका होत असताना वरुण चक्रवर्तीने मात्र त्याची बाजू घेतली आहे. मुलावर टीका करणाऱ्यांना त्याने खडेबोल सुनावले आहेत. “सोशल मीडिया कशाप्रकारे भित्र्या लोकांची जागा ठरली आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे, जे कोणतीही अक्कल न लावता फक्त तोंड वाजवत असता. तो फक्त एक लहान मुलगा आहे!! त्याला मोठं होऊ द्या.

जर तुम्हाला एक लहान मूल सहन होत नसेल विचार करा (Cricketer)समाज अजूनही या मुलावर टिप्पणी करणाऱ्यांना कशाप्रकारे सहन करत आहे,” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर नैतिकतेबद्दलची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे, अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे की सोशल मीडियावर मुलांवर किती सहजपणे कठोर टीका केली जाते. यामुळे पालकांचा दबाव आणि रिअॅलिटी शोमुळे निर्माण होणारा भावनिक तणावर याबद्दलही चर्चा रंगल आहे.
हेही वाचा :
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच निधन….
चांदीच्या दरवाढीला ब्रेक; ४००० रुपयांची घसरण…
आज शुक्रवारचा दिवस या राशींसाठी भाग्यवान…