दिल्ली मेट्रोतील(Metro) ड्रामा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोक रोज कोणत्या ना कोणत्या छोट्या कारणावरुन भांडण करताना दिसत आहे. नुकताच दोन तरुणांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भर गर्दीत हे तरुण एकमेकांना मारत आहे. एकमेकांना लाथा-बुक्क्या घालत आहेत. एकमेकांना मेट्रोच्या जमिनीवर लोळावले आहे. लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झालेला नाही. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण अचानक एकमेकांवर हल्ला चढवतात. एक तरुण समोरच्याला कानशिलात लगावतो. त्यांच्यामध्ये सुरुवातील शाब्दिक वाद सुरु असतो, पण पुढे हा वाद इतका वाढतो की दोघांमध्ये हाणामारी सुरु होते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कशा पद्धतीने दोघांनी एकमेकांवर हल्ला बोल केला आहे. एखमेकांचे शर्ट फाडले आहेत. मेट्रोतील लोक घाबरलेले दिसत आहे. काही पुरुष मंडळी त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण दोघेही ऐकायला तयार नाहीत. शिवाय एकजण दुसऱ्या तू खरा मर्द अशील तर निघून जाशील असे काही बोलत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. एका नेटकऱ्याने दिल्ली मेट्रोतच का घडते असे? असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने मेट्रोत (Metro)जाण्यासाठी आता एमएमए चा कोर्स करावा लागेल असे म्हटले आहे. आणखी एकाने दिल्ली मेट्रो कधीच निराश करत नाही, इथे रोज काही ना काही मनोरंजक गोष्टी पाहायला मिळतात असे म्हटले आहे.

यापूर्वीही दिल्ली मेट्रो अनेक वेळा चर्चेचा विषय राहिली आहे. कधी कपल रोमान्सवरुन, तर कधी महिलांच्या भांडणावरुन दिल्ली मेट्रोची चर्चा सुरुच असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तर एका आजोबांनी मेट्रोत लघुशंका केली होती, तर त्याच्या काही दिवसांपूर्वी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे मेट्रोत दिसून आहे होते. सुरुवातीला सुरुवातीला तर कपल्सचे किंसिंग व्हिडिओ देखील पाहायला मिळायचे. एकूणच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन दिल्ली मेट्रो लोकांचे मनोरंजन करतच राहते हे दिसून येते.

हेही वाचा :

ड्रायव्हरने 17 वेळा चाकू भोसकून घेतलेला जीव, 23 वर्षांच्या अभिनेत्रीच्या खूनाने हादरलेला देश

खुशखबर! महिलांच्या खात्यात आज जमा होणार ₹१०,०००

हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये, घरीच योग करावा; गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *