सोशल मिडिया (Social media)लोकांच्या मनोरंजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. इथे अनेक थक्क करणारे आणि रंजक असे व्हिडिओज शेअर केले जातात जे क्षणात लोकांचे लक्ष वेधतात. इथे डान्स, जुगाड, स्टंट अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात. अलिकडेच इंटरनेटवर एका आज्जींचा व्हिडिओ खूप जास्त ट्रेंड होत आहे. व्हिडिओमध्ये आज्जी एका समारंभात डिजेच्या तालावर जबरदस्त डान्स करताना दिसून आल्या. आज्जींचा जोश आणि त्यांचा दणकेदार डान्स इतका लक्षवेधी होता की पाहता क्षणीच यूजर्स त्यांच्या नृत्यावर घायाळ झाले. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात असून यात काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

सध्या सर्वत्र लग्नाचा सीजन सुरु आहे. इंटरनेटवरही लग्नाचे अनेक व्हिडिओ शेअर केले जात असातानाच एका व्हिडिओने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. व्हिडिओमध्ये लाल रंगाची साडी घालून आजी गाण्यावर डान्स करताना दिसून आल्या. आज्जींचा हा डान्स इतका लक्षवेधी होता की त्यांच्या आजूबाजूला (Social media)तरुणांची गर्दी दिसून आली. काहीजण हा डान्स बघण्यात मग्न झाले तर काहींनी आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य कैद केले. व्हिडिओमध्ये आज्जींची फ्लिप मात्र अधिक आकर्षक आणि अनपेक्षित ठरली ज्याने सर्वांनाच आश्चर्य केले. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही आज्जींचा हा जोश आणि त्यांचा दणकेदार डान्स अनेकांना लाज आणण्यासारखा आहे.

हा व्हायरल व्हिडिओ @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘दादी अजून म्हातारी नाहीये, तिचा किलर डान्स आणि फ्लिप बघ भावा’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वातावरणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करताना आजीने एक स्टंट केला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फ्लिप मस्त होता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, काय डान्स केला आहे”.

हेही वाचा :

कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा…

‘आम्ही भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त…’, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण

अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *