बिहार सरकारने महिलांसाठी राबवलेल्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतर्फे आज चौथा हप्ता महिलांच्या खात्यात(accounts) जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १० हजार रुपये प्रथम हप्ता म्हणून देण्यात येतात आणि व्यवसाय यशस्वीपणे चालवल्यास एकूण २ लाख रुपये मिळू शकतात.

बिहार सरकारने ऐन दिवाळीच्या निमित्ताने महिलांसाठी ही खुशखबर दिली आहे. योजनेच्या आधीच्या तीन हप्त्यांमध्ये १.२१ कोटी महिलांच्या खात्यात (accounts)पैसे जमा करण्यात आले होते. यापूर्वी पहिला हप्ता २६ सप्टेंबरला, दुसरा ३ ऑक्टोबरला आणि तिसरा ६ ऑक्टोबरला दिला गेला होता. आज चौथा हप्ता देण्यात येत असून, योजनेच्या पुढील हप्त्यांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
ही योजना महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सुरु केली गेली आहे. यामध्ये महिलांना एकूण १८ प्रकारच्या व्यवसायासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक मदत दिली जाते. महिलांनी व्यवसाय सुरु करून ६ महिने चालवला तर त्यांना २ लाख रुपये मिळणार आहेत.

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या बचत गटातील महिलांना हा हप्ता मिळणार आहे. ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत, त्यांच्यासाठी आजचा चौथा हप्ता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हेही वाचा :
हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये, घरीच योग करावा; गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान…
राज ठाकरे-उद्धव ठाकरे आज पुन्हा एकाच व्यासपीठावर…
पट्टणकोडोली यात्रेत 4 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला…