भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीड जिल्ह्यात एका जाहीर सभेत हिंदू मुलींना जिममध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी जिममध्ये(gym) जाण्याऐवजी घरी योगाभ्यास करावा, कारण “तिथे कोण प्रशिक्षण देत आहे आणि कोणता कट रचला जात आहे, हे त्यांना माहित नाही.”

पडळकर यांनी विशिष्ट समुदायाकडे इशारा करत म्हटले की, ‘ते’ हिंदू मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मुलींना सावध राहण्याचा सल्ला दिला आणि अशा जिममधून दूर राहण्याची विनंती केली जिथे प्रशिक्षक कोण आहेत, हे माहित नाही.आमदार पडळकर यांनी तरुणांची ओळख तपासण्याची मागणी केली असून, ओळखपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांवर कॉलेजमधील प्रवेशावर बंदी घालावी, असा इशारा दिला. त्यासाठी मजबूत प्रतिबंधक यंत्रणा तयार करण्याचे त्यांनी आवाहन केले.

पडळकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद आणि सामाजिक चर्चा पेटण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष या विधानाचा वापर करून भारतीय जनता पक्षावर टीका करू शकतात(gym).
हेही वाचा :
राज ठाकरे-उद्धव ठाकरे आज पुन्हा एकाच व्यासपीठावर…
पट्टणकोडोली यात्रेत 4 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला…
उद्धट पोरगं म्हणून हिणवणाऱ्यांना क्रिकेटरने सुनावलं, म्हणाला ‘अरे तो फक्त…’