सोशल मीडियावर(social media) रोज काही ना काही व्हायरल होत असते, कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही असे व्हिडिओ असतात काही पाहून किळश येईल, तर काही व्हिडिओ असे असतात की आपला संपूर्ण दिवस आनंदात जातो. सध्या असाच एक क्यूट आणि आयुष्याच्या छोट्या गोष्टींत जगायला शिकवणारा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.प्रत्येक व्यक्तीला त्याचे आयुष्य सुखात जावे, त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये याची इच्छा असते. यामुळे लोक ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करतात, भरपूर पैस कमवतात. हव्या असलेल्या वस्तू खरेदी करतात आणि त्याचा आनंद घेतात. पण तो आनंद काही क्षणापूरता मर्यादित असतो. असे म्हणतात पैशाने आनंद विकत घेता येत नाही, हे या गोंडस अशा व्हिडिओतून लक्षात येते.

या व्हिडिओ एका चिमुकल्या मुलाने प्लॅस्टिकच्या पिशवीपासून बनलेल्या शॉवरमध्ये आनंद शोधला आहे. व्हायरल होत असलेल्या गोंडस अशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिमुकला घराच्या बाहेर अंगणाच अंघोळ करत आहे. त्याच्या डोक्यावर पाण्याने भरलेली पिशवी एका झाडाच्या फांदीला लटकवण्यात आली आहे. चिमुकला मस्त असा अंगाला साबण लावतो आणि खराट्याच्या झाडूने पिशवीला होल पाडतो. ज्यामुळे पिशवीतून पाणी पडते आणि चिमुकला आनंदाने उड्या मारत शॉवरचा आनंद घेतो. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्ही देखील भावुक व्हाल.
When there is No shower 😅 pic.twitter.com/XLbV6k2IQl
— 𝓐𝓻𝓲𝓪𝓷𝓪🦋 (@shutupari_) November 25, 2025
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया (social media)प्लॅटफॉर्म एक्सवर @shutupari_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपले मत मांडत पुन्हा लहान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, आपण पुन्हा लहान होऊ शकतो का? त्या दिवसांची खूप आठवण येत आहे, तर दुसऱ्या एका युजरने सो व्होलसम असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका शॉवर इन बजेट अशी कमेंट केली आहे. सध्या हा व्हिडिओने अनेक नेटकऱ्यांची मने जिंकली आहे.

हेही वाचा :
लग्न टळल्यानंतर स्मृतीने उचललं मोठं पाऊल, इन्स्टावर पलाशला केलं अनफॉलो
लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री शिदेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…
कोण आहे Mary D’Costa? जिने स्मृती-पलाशच्या नात्यात कालवले विष