भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअर इंडियाने आपला(air) फ्रिडम सेल सुरु केला आहे. याचा लाभ घेत आता प्रवासी स्वस्तात विमान प्रवासाचा लाभ घेऊ शकतात.

१५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस, याच दिवशी(air) भारताची ब्रिटिश राजवटीतून मुक्तता झाली. हा दिवस देशभर मोठ्या जोशात साजरा केला जातो. यंदा भारताचा 79 स्वातंत्र्यदिन आणि यानिमित्तच एअर इंडिया एक्सप्रेस ने प्रवाशांसाठी खास फ्रीडम सेल ऑफर जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 50 लाख तिकिटांवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
देशांतर्गत उड्डाणे : भाडे केवळ ₹1,279 पासून सुरू
आंतरराष्ट्रीय उड्डाणे : ₹4,279 पासून उपलब्ध
बुकिंग व प्रवास कालावधी
ऑफरची सुरुवात : 10 ऑगस्ट 2025 पासून एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट व मोबाइल ॲपवर 11 ते 15 ऑगस्टदरम्यान ही ऑफर प्रमुख ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
बुकिंगची अंतिम तारीख : 15 ऑगस्ट 2025
प्रवास कालावधी : 19 ऑगस्ट 2025 ते 31 मार्च 2026
मेंबर्सना मिळणार हे अतिरिक्त लाभ
गॉरमैयर हॉट मील, केबिन बॅगेज, अतिरिक्त चेक-इन बॅगेज आणि एक्सप्रेस अहेड सेवांवर मेंबर्सना 20% पर्यंत सवलत दिली जाणार आहे.
महत्त्वाच्या अटी व नियम
सवलतीच्या भाड्यात कर, विमानतळ शुल्क आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत.
अधिकृत वेबसाइट किंवा ॲपद्वारे बुकिंग केल्यास, नेट बँकिंग पेमेंटवर एक्सप्रेस लाइट भाड्याचे प्रोसेसिंग शुल्क माफ राहील.
तिकीट रद्द केल्यास सवलतीची रक्कम परत मिळणार नाही, तसेच फ्रीडम सेल अंतर्गत बुकिंग वैध राहणार नाही.
जागा मर्यादित असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्व लागू. सवलतीची जागा संपल्यास नियमित भाडे लागू होईल.
बुकिंगनंतर परतावा मिळणार नाही. रद्द शुल्क एअरलाइनच्या नियमांनुसार लागू.
एअरलाइन कोणत्याही वेळी, पूर्वसूचना न देता, ही ऑफर थांबवू किंवा रद्द करू शकते.
कंपनीने फ्लाइट रद्द केल्यास प्रवाशांना भरपाईस पात्रता राहणार नाही.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी, झटपट घरच्या घरी बनवा पनीर कॉर्न बॉल
फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेलमध्ये आयफोन 16 सह ‘या’ 5 जी फोनवर मिळणार मोठी सूट
अर्जुन तेंडुलकरची होणारी नवरी, सानिया चांडोक काय काम करते? आहे बड्या उद्योगपतीची मुलगी