साध्या रोजच्या सवयींमध्ये केलेला छोटासा बदल तुमच्या आर्थिक आयुष्याचा पूर्ण खेळ बदलू शकतो. उदाहरणार्थ, दररोजच्या चहा-नाश्त्यावर खर्च होणारे ३० रुपये तुम्ही वाचवून म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट(investment) प्लॅन मध्ये गुंतवले तर दीर्घकाळात तुम्हाला कोट्यधीश बनवणारी संपत्ती मिळू शकते.

समजा, तुम्ही ३० व्या वर्षापासून ७० व्या वर्षापर्यंत महिन्याला ९०० रुपये SIP मध्ये गुंतवता आणि अंदाजे १३% वार्षिक रिटर्न मिळतो, तर ४० वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक (investment)४.३२ लाख रुपये असून तुम्हाला अंदाजे १.१७ कोटी रुपये मिळू शकतात. या यशामागे कंपाउंडिंगची जादू आहे—व्याजावर व्याज मिळणे आणि गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त, तितका फायदा जास्त. SIP एक सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग आहे.

तुम्ही Zerodha, Groww, Kuvera, Paytm Money यांसारख्या प्लॅटफॉर्मवर खाते उघडून मासिक रक्कम निश्चित करून ऑटो-डेबिटद्वारे गुंतवणूक सुरू करू शकता. मात्र, म्युच्युअल फंडात बाजारातील चढ-उतारानुसार जोखीम असते, त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा आणि आवश्यक असल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :

‘कच्चा बादाम’ गाणे आठवतंय का? झोपडीत राहणारा गायक आज राहतोय बंगल्यात..

एकाने कानशिलात लगावली, तर दुसऱ्याने लाथ घातली अन्…; तरुणांच्या हाणामारीचा VIDEO तुफान व्हायरल

ड्रायव्हरने 17 वेळा चाकू भोसकून घेतलेला जीव, 23 वर्षांच्या अभिनेत्रीच्या खूनाने हादरलेला देश

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *