कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २९ वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराकडून ब्लॅकमेल(blackmailed) आणि बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये आरोपीने सुरुवातीला लग्नाचे वचन दिले, पण नंतर त्याच्यातील नराधम जागा झाला आणि पीडितेवर सतत अत्याचार सुरू झाला.

आरोपीने तरुणीचा मोबाईल हॅक करून, तिच्या आणि इतर मुलींच्या आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो काढले. त्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची(blackmailed) धमकी देत पीडितेसोबत बलात्कार केला आणि तिच्या आई-वडिलांना तसेच भावालाही ब्लॅकमेल केले. आरोपी हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून, त्याने प्रकरण दाबण्यासाठी पीडितेवर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
पीडितेने पोलिसांना आरोपीचा मोबाईल सादर केला, ज्यात आरोपीच्या अनेक अश्लील व्हिडिओ व फोटो असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर खडकपाडा पोलीसांनी आरोपीविरोधात बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, आरोपी लवकरात लवकर पकडण्यासाठी तपास सुरु आहे.
हेही वाचा :
सांगली पोलिस कॅन्टीनमध्ये ७४ लाखांचा अपहार, अधिकाऱ्यांसह, कॅन्टीन व्यवस्थापकावर गुन्हा
क्रिकेटपटू स्मृती मानधना इंदौरची सून होणार, कोण आहे होणारा नवरा…
रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात, महिलेने साडीलाच लावली आग अन् घरभर पळत सुटली अन् Video Viral