दिवाळीचे दिवस जवळ आले किंवा एकंदरच दिवाळीचा महिना जवळ आला की त्यादरम्यान येणाऱ्या पगारासमवेत नोकरदार वर्गाला किंवा प्रत्येक कर्मचाऱ्याला खात्यावर प्रतीक्षा असते ती म्हणजे दिवाळी बोनसच्या (Bonus)रकमेची. पगाराव्यतिरिक्त खात्यावर येणारी ही वाढीव रक्कम फक्त कर्मचाऱ्यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा आनंद देऊन जाते. प्रत्येक कर्मचारी वर्गामध्ये एकच चर्चा असते, ती म्हणजे ‘बोनस किती आला?’

कधीकाळी हातात येणारं रोकड स्वरुपातील बोनसचं(Bonus) पाकिट आता दिसत नसलं तरीही बँक स्टेटमेंटमध्ये वाढीव रकमेचा मेसेज मोबाईलमध्ये डोकावून जातो आणि हा अनुभव अनेकांसाठीच सुखावणारा असतो. अशी ही बोनसची परंपरा नेमकी कधी आणि कशी सुरू झाली, दिवाळीशी त्याचं नेमकं नातं काय? हे माहितीये?
दिवाळी बोनससंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी ब्रिटीशकालीन भारतात डोकावण्याची गरज आहे. हा तोच काळ होता जेव्हा मजुरांना दर आठवड्याच्या हिशोबानं पगार दिला जात होता. म्हजेच वर्षभरातील 52 आठवड्यांचा हिशोब झाल्यास पगार मिळतो 52 वेळा. मात्र ब्रिटीशांनी सरकारनं तेव्हा असा विचार केला की मजुरांना आठवड्यापेक्षा वर्षभरात मासिक वेतन दिल्यास फक्त 12 वेळा पगार देणं अधिक सोपं असेल… आणि याच विचारानं मासिक वेतनाची सुरुवात झाली.
वस्तूस्थिती पाहिली, तर जिथं 52 आठवड्यांच्या हिशोबानं जिथं मजुरांना रोजंदारी मिळत होती, तिथं आला 12 वेळा येणारा पगार म्हणजे किमान 4 आठवड्यांचा पगार कमी झाला. ही बाब लक्षात येताच मजुरांमध्ये असंतोषाची लाट उसळली आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी ब्रिटीश प्रशासनानं प्रयत्न सुरू केले. अखेर 1940 मध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आला, जिथं मजुरांना एक वाढीव पगार दिला जाईल, जेणेकरुन वर्षभरात होणारी ‘घट’ भरून काढता येईल असा हिशोब निर्धारित करण्यात आला. याला नाव देण्यात आलं, 13th Month Salary म्हणजेच 13 व्या महिन्याचा पगार. कारण, प्रत्यक्षात एका वर्षात 12 महिने, मिळणारा पगार 12 महिन्यांचा आणि हा वाढीव पगार होता 13 व्य़ा अर्थात एका काल्पनिक महिन्याचा, जो पुढं बोनस ठरला.
जेव्हापासून हा वाढीव पगार मिळू लागला तो सहसा दिवाळीच्याच काळात देण्यात येत होता, कारण भारतात हा सर्वात मोठा सण आहे. ज्यामुळं हाती येणाऱ्या या रकमेला ‘दिवाळी बोनस’ म्हटलं जाऊ लाहलं. सुरुवातीला ही रक्कम भेट समजली जात होती. मात्र हळुहळू ही रक्कम म्हणजे आपला हक्क असल्याचा सूर एकजुटीनं आळवत कामगार संघटना आकारास आल्या आणि हा मुद्दा गांभीर्यानं चर्चेत आला. अखेर 1965 मध्ये Payment of Bonus Act ची निर्मिती झाली, ज्याअंतर्गत कंपन्यांकडून दिला जाणारा बोनस हा सदिच्छा भेट नसून एक कायदेशीर अनिवार्यता ठरली.
बोनसच्या इतिहासात डोकावलं असता भारतात सर्वप्रथम कापड उद्योगात सक्रिय असणाऱ्या अर्थात सूत गिरणीतील कामगारांना दिवाळी बोनस(Bonus) द्यायला सुरूवात केली. मुंबई आणि कोलकाता येथील मोठ्या गिरण्या त्यावेळी ब्रिटीशांच्या मालकीच्या होत्या. इथं कामगारांनी संघटित होत आंदोलनं केली आणि पहिल्यांदाच तिथं दिवाळीच्या निमित्तानं बोनस दिला गेला. हळुहळू रेल्वे, कोळसा खाण क्षेत्र, बँक क्षेत्रांमध्येही हे धोरण लागू झालं आणि खासगीसोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू लागला ‘बोनस’चा फायदा.
हेही वाचा :
They Call Him OG ओटीटीवर कधी होणार प्रदर्शत? या OTT प्लॅटफॉर्मवर येणार पाहता
अंधाऱ्या राती रस्त्यावर फिरतोय मानकाप्या, मागे लागून करतोय पाठलाग… पाहून सर्वांची उडाली घाबरगुंडी; Video Viral
अवघ्या 1 रुपयात अमर्यादित कॉल, 2GB डेटा आणि 100 SMS!