मोबाईल नेटवर्क(network) कंपन्यांमध्ये जियो, एअरटेल, व्हीआय या कंपन्याच आघाडीवर आहेत. पण सरकारी कंपनी बीएसएनलने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणलीय. भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने आपल्या स्वदेशी 4G नेटवर्कच्या लॉन्चनंतर पहिल्यांदाच ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर आणलीय. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने केवळ 1 रुपयात अनलिमिटेड कॉल, रोज 2GB डेटा आणि 100 SMS देणारा खास प्लान आणलाय.

ही योजना नवीन ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलीय. जे ग्राहक सध्या एअरटेल किंवा जिओच्या नेटवर्कवर आहेत, ते बीएसएनएलच्या या आकर्षक ऑफरचा लाभ घेऊन स्वदेशी 4G नेटवर्कवर(network) सहज स्विच करू शकतात. या ऑफरअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा 30 दिवसांसाठी वैध असतील. बीएसएनएलने यापूर्वी स्वातंत्र्यदिनानिमित्त असाच एक प्लान आणला होता. पण तेव्हा 4G नेटवर्क पूर्णपणे कार्यान्वित झाले नव्हते. आता देशभरात 98,000 टॉवर्सद्वारे बीएसएनएलचे 4G नेटवर्क कार्यरत आहे, ज्यामुळे ग्राहकांना वेगवान आणि विश्वासार्ह सेवा मिळेल.
बीएसएनएलने या योजनेला ‘दिवाळी बोनान्झा’ असे नाव दिले आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबले आहे. ट्रायच्या अहवालानुसार, नवीन ग्राहक जोडण्यात बीएसएनएलने एअरटेललाही मागे टाकले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपल्या परिसरात बीएसएनएल 4G नेटवर्क उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करावी लागेल.
बीएसएनएलने नंबर पोर्टिंग करणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळेल की नाही, याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. तथापि, नवीन ग्राहकांसाठी ही योजना असल्याने, नंबर पोर्ट करणाऱ्या ग्राहकांना कदाचित याचा लाभ मिळू शकेल. 5G सेवांचा लवकरच शुभारंभ बीएसएनएलच्या या ऑफरमुळे ग्राहकांमध्ये उत्साह आहे. कंपनी लवकरच देशभरात 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ती खाजगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करू शकेल.
विशेष म्हणजे, या प्लानमध्ये मोफत सिमकार्ड देखील उपलब्ध आहे. ही ऑफर 15 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. या कालावधीत बीएसएनएलच्या 4G नेटवर्कशी जोडले जाणारे नवीन ग्राहक या सुविधांचा 30 दिवसांसाठी लाभ घेऊ शकतील. यानंतर ग्राहक आपल्या गरजेनुसार कोणताही रिचार्ज प्लॅन निवडू शकतात.
हेही वाचा :
आधी कचरा कुंडी एकमेकांच्या डोक्यात घातली, मग बेल्ट काढला अन्… तुफान हाणामारी, VIDEO VIRAL
अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार..
भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार, तरुणाचं काळं कांड व्हिडिओ मध्ये कैद…