भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन वार्षिक प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत, जे एकदा रिचार्ज (Recharge)केल्यावर पूर्ण वर्षभर कॉल, डेटा आणि एसएमएसचा uninterrupted वापर करण्याची सोय करतात. या दोन प्लॅनची किंमत अनुक्रमे ₹३५९९ आणि ₹३९९९ आहे आणि दोन्ही प्लॅन ३६५ दिवसांची वैधता देतात. ₹३५९९ च्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल, तसेच दररोज १०० एसएमएस दिले जातात.

या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्रपणे अमर्यादित ५जी डेटा उपलब्ध असणे, जो फक्त ५जी नेटवर्क असलेल्या क्षेत्रात वापरता येईल. याशिवाय एअरटेल स्पॅम वॉर्निंग सिस्टम, मोफत हेलोट्यून आणि १७,००० रुपयांचे परप्लेक्सिटी प्रो एआय टूल सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. हा प्लॅन मुख्यतः अशा यूजर्ससाठी उपयुक्त आहे, ज्यांना फक्त कॉलिंग आणि आवश्यक इंटरनेट वापरासाठी योजना हवी आहे.
तर, ₹३९९९ चा वार्षिक प्लॅन अधिक प्रीमियम स्वरूपाचा आहे. यात दररोज २.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, तसेच हॉटस्टार मोबाईलचे संपूर्ण १ वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यातही ५जी डेटा, स्पॅम अलर्ट, हेलोट्यून आणि एआय सबस्क्रिप्शन सेवा दिल्या जातात. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी सर्वोत्तम आहे ज्यांना जास्त डेटा आणि डिजिटल एंटरटेनमेंटचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे.
दोन्ही प्लॅन एक वर्षासाठी रिचार्ज-मुक्त अनुभव देतात, ज्यामुळे पैसे वाचतात आणि वारंवार रिचार्ज(Recharge) करण्याचा त्रास टळतो. त्यामुळे जर तुम्ही फक्त साध्या वापरासाठी योजना शोधत असाल तर ₹३५९९ चा प्लॅन योग्य ठरेल, तर डिजिटल एंटरटेनमेंटसाठी आणि जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी ₹३९९९ चा प्रीमियम प्लॅन अधिक उपयुक्त ठरेल.
हेही वाचा :
कोल्हापुरात बिबट्याच्या हल्यात शाहूवाडीतल्या वृद्ध दाम्पत्याचा अंत…
पुढच्या वर्षी सोनं किती महागणार? काय असेल रेट? बाबा वेंगाची थक्क करणारी भविष्यवाणी काय?
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, रोहित-विराट फ्लॉप ठरल्यानंतर गावस्करांची मोठी भविष्यवाणी