जगात असा एक साबण आहे ज्याची किंमत हजार रुपये (soap)नाही तर लाखांच्या घरात आहे. हा साबण जगातला सर्वाधिक राजेशाही थाट असलेला महागडा साबण आहे. हा बनतो तरी कुठे आणि कसा, हे जाणून घेऊयात…

जगातील सर्वात महागडा साबण

24 कॅरेट सोन्याचा हा साबण श्रीमंत माणसं अंघोळीसाठी वापरतात

कुठे मिळतो हा साबण ?

हात धुण्यासाठी किंवा अंघोळीसाठी साबण हा हवाच. (soap)अन्न, वस्त्र निवारा याप्रमाणे शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी साबण हा गरजेचाच आहे. पण याची गरज जरी मोठी असली तरी त्याला लॉकरमध्ये ठेवावं लागेल इतकं तरी त्याला अजून महत्व आलेलं नाही. सर्वासाधारण साबण हा फार फार 50 रुपयांनापर्यंत मिळतो. पण जगात असा एक साबण आहे ज्याची किंमत हजार रुपये नाही तर लाखांच्या घरात आहे. हा साबण जगातला सर्वाधिक राजेशाही थाट असलेला महागडा साबण आहे. हा बनतो तरी कुठे आणि कसा, हे जाणून घेऊयात…

त्वचेसाठी फायदेशीर

राजेशाही थाट असलेला हा साबण 24 कॅरेट सोन्याचा असल्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. त्याशिवाय जगातील दुर्मिळ अशा आयुर्वेदिक वनस्पती ज्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत अशांचा समावेश यात आहे. पुर्णत: नैसर्गिक असलेला हा साबण त्वचा कोमल आणि तजेलदार ठेवण्यासाठी फायदेशीर आहे, असा दावा केला जातो.

कुठे बनतो हा साबण ?

लेबनान येथील त्रिपोली शहरात हा साबण तयार केला जातो. खरंतर या साबणाच्या विक्रीसाठी देखील हे शहर प्रसिद्ध आहे. बदर हसन अँड सन्स कंपनी आयुर्वेदिक आणि नैसर्गिक साधनांचा वापर करुन हा साबण तयार करते. सुगंधित तेल आणि सामग्रींचा यात समावेश असून अस्सल सोन्याचा लेप असल्याने या साबणाला राजेशाही थाट मिळतो. हा साबण संयुक्त अरब अमिराती मधील निवडक दुकानांमध्ये विकला जातो, त्यामुळे फक्त खास व्यक्तींना आणि जवळच्या पाहुण्यांना जगभरातील अनेक श्रीमंत माणसं हा साबण भेट म्हणून देतात. हा साबण सामान्य बाजारात सहज मिळत नाही. यूएईमधील काही खास दुकानांमध्ये तो विकला जातो, तर सर्वात महाग प्रकार फक्त खास व्यक्तींसाठी राखीव आहे.त्यामुळे याची किंमत लाखाच्या घरात आहे. बीसीच्या अहवालानुसार, सोन्याची पावडर यात असल्याने साबणाची पृष्ठभाग खडबडीत वाटतो, पण तो त्वचेला कोणत्याही प्रकारची ईजा करत नाही.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….

राजकारण्यांची”फटाके”बाजी….

मध्यरात्री आगीचा तांडव ,सोसायटीत भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *