आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाने या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे(decision). महापालिका निवडणुकीत नव्या पिढीला संधी देण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.ठाकरे गटाच्या या निर्णयामुळे अनेक अनुभवी नगरसेवकांची नाराजी ओढावली जाण्याची शक्यता असून काहींनी वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू आहे. आता या संभाव्य निर्णयाचे ठाकरे गटातील अंतर्गत समीकरणांवर आणि महापालिका निवडणुकीच्या रणनितीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटात नव्या चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्याची तयारी सुरू आहे. ज्येष्ठ नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नसली, तरी माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना तिकिट देण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरू आहे. या धोरणामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ठाकरे गटाकडून सुमारे ७० टक्के उमेदवार हे नवे चेहरे असतील. या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी आगामी निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे तसेच स्थानिक पातळीवर रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे समजते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप अधिकृत युतीची घोषणा केलेली नसली, तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या काही संयुक्त बैठका सातत्याने सुरू आहेत. या बैठकीत प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद, प्रभाव आणि स्थानिक गणितांचा विचार करून जागावाटपाचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू (decision)आहे.शिवसेनेने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ८४ जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने आता त्यांच्या जागी नवीन चेहरे उतरवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या माजी नगरसेवकांना या वेळी उमेदवारी देण्यात येणार नाही.

तथापि, संबंधित वॉर्डातील उमेदवार निश्चित करताना त्या माजी नगरसेवकांचा अनुभव आणि पक्षातील योगदान लक्षात घेऊन त्यांचे मत विचारात घेतले जाणार आहे. या निर्णयामुळे नव्या पिढीला संधी मिळून पक्षात तरुण नेतृत्वाचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना आणि नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीच्या चौकटीत राहून लढवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “आपापल्या मतदारसंघांमध्ये सक्रियपणे फिरा, संघटन मजबूत करा आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामाला लागा. अगदीच जिथे मतभेद जुळून येत नसतील, तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत करू. मात्र, इतर सर्व ठिकाणी निवडणूक महायुतीच्या नावानेच लढवली जाईल.” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीतील बँक व्यवस्थापकाचा डोक्यात सिमेंटचा नळा घालून खून
लोणचे प्लास्टिकच्या डब्यात ठेवावे की काचेच्या बरणीत? जाणून घ्या..
‘मी अश्वत्थामाच जो कधीच…’, श्रेयस अय्यर असं का म्हणाला…