भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी सेमी फायनल सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून फायनलचं तिकीट मिळवलं. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी तब्बल 339 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाच्या धाकड महिला फलंदाजांनी 5 विकेट राखून पूर्ण केलं. हे आव्हान महिलांच्या वनडे सामन्यात भारताने यशस्वीरित्या गाठलेले सर्वोच्च लक्ष्य आहे. जेमिमा रॉड्रिग्सने (नाबाद 127) आणि हरमनप्रीत कौरने (89) भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनल गाठल्यावर अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी त्यांना शुभेच्छा(reaction) दिल्या आणि कौतुक केलं.

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने सांगितलं की, ‘ऑस्ट्रेलियाच्या एका बलाढ्य संघावर काय जबरदस्त विजय मिळवला. मुलींनी खूप चांगलं चेज केलं आणि या मोठ्या सामन्यात जेमिमाची फलंदाजी उल्लेखनीय ठरली. हे दृढ़ता, विश्वास आणि चिकाटीचे प्रदर्शन आहे’.भारताचा स्टार क्रिकेटर सचिन तेंडुलकरने सांगितलं की, ‘शाब्बास जेमिमा, हरमनप्रीत कौर आघाडीवरून नेतृत्व केल्याबद्दल. श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी आपल्या गोलंदाजीने खेळ जिवंत ठेवला’.भारताचा स्टार क्रिकेटर इरफान पठाणने सांगितलं की, ‘शांत आणि संयमी राहून भारतीय महिला संघाने केलेला धावांचा पाठलाग पाहणं खूप आनंददायी (reaction)आहे. जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांचे हे खेळ खूपच छान आहेत. रिचा घोषचा तो कॅमिओ खूप महत्त्वाचा होता’.

भारताच्या सेमी फायनलमधील विजयाची शिल्पकार ठरलेली जेमिमा रॉड्रिग्स सुद्धा ऑस्ट्रेलियावरील दणदणीत विजयानंतर मैदानात ढसाढसा रडली. जेमिमाच्या शतकीय खेळीने भारताला फायनलचं तिकीट मिळवून दिलं. भारतीय संघ संकटात असताना जेमिमा मैदानात टिकून राखील आणि धावांचा डोंगर फोडला. मागील काही महिन्यात जेमिमा रॉड्रिग्सच्या करिअरमध्ये अनेक चढ उतार आले. तिच्या वडिलांवर धर्मांतरणाचे आरोप सुद्धा झाले. जेमिमासाठी मागील 12-18 महिने फारच अवघड होते. टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये तिला स्थान मिळत नव्हते. पण सततचे प्रयत्न आणि चिकाटीने आज तिने भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या विजयानंतर जेमिमा मैदानात खाली बसली आणि रडू लागली. तसेच तिने स्टॅन्डमध्ये बसलेल्या तिच्या आई वडिलांना सुद्धा फ्लायिंग किस दिली.
हेही वाचा :
गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा
सांगलीत मित्रानेच मित्राचा गळा चिरून निर्घृण खून केला…
शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत बिघडली; लिलावती रुग्णालयाबाहेरचा अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल
