राज्यात (Maharashtra)हळूहळू थंडीचा प्रारंभ झाला असून, पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशीरा सुरू झाली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा उघडिप, कोरडे हवामान, निरभ्र आकाश आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने किमान तापमानात घट होत आहे.

खानदेशासह राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तापमान १४ अंशांच्या खाली आल्याने गारठा जाणवू लागला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन चक्रीवादळामुळे पुढील २४ तास हवामानातील घडामोडींसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत देशातील चार ते पाच राज्यांमध्ये हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः केरळमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत वादळासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि ईशान्य भारतातील(Maharashtra) काही भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या भागांमध्ये पावसासोबतच जोरदार वारे आणि वादळी हवामानाचा अनुभव येऊ शकतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, संबंधित राज्य प्रशासनांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :
22 कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रव्याचा चिल्ला
नवीन Hero Xtreme 160R लवकरच होणार लाँच? मिळणार धमाकेदार लूक