सकाळच्या नाश्त्यात(breakfast) प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. सकाळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रव्याचा चिल्ला बनवू शकता. रव्याचा वापर करून सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात अनेक वेगवेगळे बनवले जातात. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जातो आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. बऱ्याचदा लहान मुलं भाज्या आणि कांदा टोमॅटो खाण्यास नकार देतात. जेवणातील कांदा टोमॅटो बाहेर काढून फेकून दिला जातो. अशावेळी तुम्ही मुलांसाठी अनेक नवनवीन पदार्थ बनवून खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रव्याचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
रवा
मीठ
कांदा
टोमॅटो
हिरवी मिरची
दही
शिमला मिरची
कोथिंबीर
तेल
राजस्थनी पद्धतीमध्ये झटपट बनवा ‘मिरची के टिपोरे’, चटपटीत रेसिपी पाहून सगळ्यांच्या तोंडाला सुटेल पाणी

कृती:
रव्याचा चिल्ला बनवण्यासाठी (breakfast)सर्वप्रथम, कांदा टोमॅटो आणि इतर भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भाज्या व्यवस्थित बारीक चिरा. यामुळे लहान मुलं भाज्या खातील.टोपात वाटीभर रवा घेऊन त्यात दही, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आणि हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा.

सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. पिठात गुठळ्या राहू नये म्हणून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. तयार केलेले पीठ काहीवेळ झाकण लावून ठेवा.तवा गरम करून त्यावर तेल पसरवा. त्यानंतर रव्याचे मिश्रण गोलाकार पसरवून दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवून घ्या.तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रव्याचा चिल्ला. हा पदार्थ हिरवी चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

हेही वाचा :

नवीन Hero Xtreme 160R लवकरच होणार लाँच? मिळणार धमाकेदार लूक

तावडे हॉटेलनजीकची स्वागत कमान उतरवली…

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताच्या तेल खरेदीबद्दल अत्यंत मोठा दावा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *