पार्थ पवार यांच्या कंपनीवर झालेल्या जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, “प्रशासन, राजकारण (politics)आणि कुटुंब या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून पाहता आम्ही अनेकदा एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो आहोत. माझा एक नातू अजित पवारांच्या विरोधात उभा होता, तर अजित पवारांची पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यामुळे आमच्या कुटुंबात राजकारण वैयक्तिक नात्यांपेक्षा विचारधारेवर आधारित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराच्या(politics) निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजकीयपणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप होत आहेत. यावर विचारले असता, शरद पवार म्हणाले, “या विषयावर मी काही भाष्य करणार नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर विषय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जर तो खरोखरच गंभीर मुद्दा असेल, तर त्याची सखोल चौकशी करून वास्तव समाजासमोर आणले पाहिजे.”या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या मुद्द्यावर सावध पण ठाम भूमिका घेतल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

हेही वाचा :
या स्पर्धेत नाही होणार India vs Pakistan सामना…
बँक अकाउंटशिवाय UPI पेमेंट…
भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, मध्यरात्री झोपेत असताना जागीच संपवलं