दुचाकी वाहन क्षेत्रात अग्रणी असलेली Hero MotoCorp कंपनी आता चारचाकी वाहनांच्या जगातही पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी युनिट VIDA अंतर्गत “Novus NEX 3” ही मायक्रो इलेक्ट्रिक (electric car)चारचाकी कार सादर करण्यात येणार आहे. याआधी कंपनीने NEX 1 (पोर्टेबल वियरेबल माइक्रो मोबिलिटी डिव्हाईस) आणि NEX 2 (इलेक्ट्रिक ट्राईक) अशी दोन उत्पादने बाजारात आणली होती. Hero MotoCorp ने अलीकडेच VIDA VX2 Urban Scooter युरोपियन बाजारात उतरवण्याची घोषणाही केली आहे.

Hero MotoCorp ने आपल्या नव्या तंत्रज्ञानाची झलक EICMA 2025 या आंतरराष्ट्रीय ऑटो शोमध्ये दाखवली. यावेळी कंपनीने NEX 3 या मायक्रो इलेक्ट्रिक वाहनासह दोन कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक मोटारसायकली — VIDA Concept UBEX आणि VIDA Project VXZ — सादर केल्या. ही सर्व वाहने स्मार्ट, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक असतील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
NEX 3 हे एक अत्यंत कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक वाहन (electric car)असून ते शहरी तसेच ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांवर सहजपणे चालवता येईल. दोन आसनांच्या (एकामागे एक) या वाहनाचे डिझाईन फ्युचरिस्टिक आणि पर्यावरणपूरक आहे. सुरक्षितता आणि आराम यांचा विचार करून तयार केलेल्या या वाहनाची किंमत अंदाजे चार लाख रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे.
Hero MotoCorp च्या मते, हे वाहन वैयक्तिक वापरासाठी आणि शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल. कारपेक्षा कमी जागा घेणारे आणि हवामानाच्या कोणत्याही परिस्थितीत वापरता येणारे हे वाहन असल्यामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Hero MotoCorp ने ही नवीन इलेक्ट्रिक उत्पादने Zero Motorcycles या अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने विकसित केली असून, आगामी काळात ही उत्पादने भारतीय बाजारातही पाहायला मिळतील अशी शक्यता आहे.

हेही वाचा :
राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर…: खा. शरद पवार
या स्पर्धेत नाही होणार India vs Pakistan सामना…
बँक अकाउंटशिवाय UPI पेमेंट…