कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने आय.टी.उद्योगासाठी खरेदी केलेल्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीचे प्रकरण सध्या राज्यभर आणि राज्याबाहेरही गाजते आहे. या संदर्भात अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया मीडियासमोर दिलेले आहेत.पण हे प्रकरण ज्यांच्याभोवती फिरते आहे ते पार्थ पवार मात्र कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यासाठी पुढे आलेले नाहीत. कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी हे मौन वृत धारण केलेले असावे असे दिसते(scam).अमेडिया कंपनीचे एक टक्का भागीदार असलेले दिग्विजय पाटील, कुलमुखत्यार धारक शितल तेजवानी आणि सहज दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ज्यांनी या तथाकथित खरेदी खतावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असले तरी, तसेच चौकशीचे आदेश पारित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिग्नेटीव ॲथॉरिटी असे अधोरेखित केले असले तरीपार्थ पवार हे या गंभीर गुन्ह्यातून कसे काय सुटू शकतात याचा खुलासा मात्र ते मूळचे वकील असतानाहीत्यांनी केलेला नाही.दिग्विजय पाटील यांनी अमेडिया कंपनीच्या वतीने एक टक्क्याचे भागीदार म्हणून तथाकथीत खरेदी पत्रावर स्वाक्षरी केली असली तरी, या कंपनीचे मोठे भागीदार पार्थ पवार आहेतआणि त्यांची या व्यवहाराला मान्यता आहे हे कागदोपत्री सुचित होते आहे. आणि म्हणूनच पार्थ पवार यांना या गुन्ह्यातून वगळता येणार नाही असे काही विधीज्ञांचे मत आहे.

एखाद्या सराईत गुन्हेगाराने चोरी केली आणि चोरीतील सोन्याचे दागिने सराफाला विकले तरसराफावर सुद्धा गुन्हा दाखल केला जातो. अनेकदा खुनासारखा गुन्हा एकाच व्यक्तीकडून केला जातो पण खून करताना त्याच्या सोबत असणाऱ्यावर सुद्धा खुनाचाच गुन्हा दाखल केला जातो.कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन ही महार वतनाची जमीन. तिची खरेदी विक्री अगदी सहजपणे होत नाही. कोरेगाव पार्क येथील जमिनीवर तर शासनाचीमालकी आहे. अशी ही जमीन अगदी अल्प किमतीत आपल्या कंपनीसाठी कशी विकत घ्यायची? त्यातील अडथळे (scam)कसे दूर करायचे?कागदपत्रांची फेरफार कशी करायची? यासाठी केलेला विचार हा एका गुन्हेगारी कटाचा एक भाग आहे. आणि मग हा कट उघडकीस आला तर कटातील सर्व व्यक्तीसंशयीत आरोपी ठरू शकतात. कोरेगाव पार्क येथील ही जमीन खरेदी करणे हा एका व्यापक कटाचा एक भाग आहे हे नाकारता येत नाही.

आणि म्हणूनच पार्थ पवार हे क्रमांक एकचे संशयित आरोपी ठरू शकतात.पार्थ पवार हे राजकीय बाहुबली घराण्यातून येतात.त्यांचे वडील अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत, त्यांची आत्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत, त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत, त्यांचे आजोबा शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. आणि म्हणूनच या जमीन खरेदी प्रकरणाला गांभीर्य आलेले आहे. ज्यांच्यावर आरोप आहे ते पार्थ पवार का बोलत नाहीत? मीडिया समोर का येत नाहीत? असा साधा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्रीअसूनही त्यांचे स्वतःचे असे मालकीचे मुंबईत घर नाही.मिस्टर क्लीन म्हणून त्यांची महाराष्ट्रात प्रतिमा आहे.पण या जमीन खरेदी विक्री प्रकरणात सर्वात अधिक अडचण त्यांची झाली आहे.

पार्थ पवार हे या प्रकरणात मुख्य सूत्रधार आहेत हे त्यांना माहित आहे. पण त्यांनीसिग्नेटिव्ह ऑथॉरिटी हा शब्दप्रयोग करून अप्रत्यक्षपणे पार्थ पवार यांना या गंभीर प्रकरणातून वगळलेले दिसते. सिग्नेटिव्ह ऍथॉरिटी हा त्यांनी बचावासाठी वापरलेला शब्द आहे. सिग्नेटिव्ह ऍथॉरिटी म्हणून दिग्विजय पाटील यांचाया प्रकरणात रोल आहे. म्हणून तेच या सर्व प्रकरणाला जबाबदार आहेत असे त्यांना म्हणावयाचे आहे.अजितदादा पवार हे हा व्यवहार रद्द झालेला आहे असे म्हणतात. पण आता हा व्यवहार एकतर्फी रद्द होऊ शकत नाही. त्यासाठी 21 कोटी रुपयांचे मुद्रांक आणि 21 कोटी रुपयांचा दंड असे एकूण 42 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा केल्याशिवाय हा व्यवहार रद्द होऊ शकत नाही.

महार वतनाची जमीन म्हणून नजराना शुल्क यामध्ये आणले तर ही रक्कम पावणे दोनशे कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते. जी शासकीय देय रक्कम आहे ती देऊनही आणि व्यवहार रद्द होऊनही मूळचा गुन्हा मात्र रद्द करता येऊ शकत नाही.दिग्विजय पाटील, शितल तेजवानी यांच्या जबाबवावातून काही जणांची नावे आली तर पोलिसांना त्याची दखल घेऊन तपासाची व्याप्ती वाढवावी लागेल. तथापि या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणाचाही दबाव येता कामा नये. सध्या तरी सरकार पार्थ पवार यांना वाचवत आहे, असाच एक संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला आहे.

हेही वाचा :

‘या’ राज्यातील बँक राहणार बंद…RBI न का दिली 11 नोव्हेंबरला बँकांना सुट्टी

एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद

पात्र असूनही ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन थांबणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *