शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली असली तरी रात्रीची थंडी अजूनही (cold) कायम असल्याने दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत जाणवू लागली आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंड हवामान याचा थेट परिणाम नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. तसेच हवामानातील सततच्या बदलामुळे टायफॉइडसारख्या गंभीर आजारांची लक्षणेही दिसू लागली आहेत.
मंगळवारपासून दि. १० बारावीच्या परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

हवामानातील हा बदल विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम करू शकतो, (cold)अशीही भावना पालक व्यक्त करीत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी दि. ८ जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील आठ दिवसांत दिवसाचे तापमान हळूहळू वाढून ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, तसेच रात्रीच्या तापमानात सुमारे ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे.
मात्र, तापमानातील ही तफावत कायम राहणार असल्याने आरोग्यविषयक धोके (cold)वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील खराब हवेची गुणवत्ता आणि वाढते वायू प्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. रविवारी वाऱ्याचा वेग ताशी १४ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, हवेत धूळ आणि कणांचे प्रमाण वाढल्यामुळे श्वसनविकार, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दिवसा कडक ऊन, आकाशात हलके ढग आणि रात्री जाणवणारी थंडी ही स्थिती विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि दीर्घ आजार असलेल्या नागरिकांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते.
डॉक्टरांचा सल्ला : अशी घ्या आरोग्याची काळजी
लहान मुलांना सकाळी व रात्री गरम कपडे वापरावेत
दिवसा उन्हात बाहेर जाताना टोपी, छत्री व पाणी सोबत ठेवावे
उकळलेले व स्वच्छ पाणीच पिणे आवश्यक
बाहेरील उघड्या ठिकाणचे अन्न टाळावे
ताप, अंगदुखी, उलटी, जुलाब आदी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
हवामानाचा शरीरावर होणारा परिणाम
१) जोरदार वारा, वादळ किंवा थंडीमुळे आरोग्यामध्ये बदल होतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने, व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत नाही. परंतु हृदयरोगी, उच्च रक्तदाबाचे रुग्ण आणि मधुमेहींचे आजार अधिक वाढतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
२) हिवाळा आणि शरद ऋतूमध्ये पोटाशी संबंधित आजारांची तीव्रता भूक न लागणे, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, पोटदुखी इत्यादींसारखी असते.
३) जास्त उष्णतेमुळे हृदयावर विपरीत परिणाम होतात. अनेक डॉक्टर पुष्टी करतात की उन्हाळ्यात हृदयविकाराचे झटके येतात. तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांची तीव्रता वाढते. म्हणून, हृदयरोगाने ग्रस्त असलेल्यांनी किंवा गर्भधारणेदरम्यान काळजी घेणे चांगले.
हेही वाचा :
शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवल्यास ‘या’ शाकाहारी पदार्थांचे करा सेवन
अँड्रॉइड फोनमध्ये ताबडतोब बदला ‘ही’ सेटिंग, तुमचा फोन चालेल एकदम फास्ट
स्मृती मंधानाच्या आईने पलाश मुच्छलबाबत केलेली पोस्ट चर्चेत! मग करावी लागली डिलीट