शासकीय(government) सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. मात्र, हा लाभ सतत मिळावा यासाठी काही अटींचे पालन आवश्यक असते. शासनाकडून ठरवलेले नियम पाळले नाहीत, तर पात्र असूनही कर्मचाऱ्यांची पेन्शन थांबू शकते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हे प्रमाणपत्र सादर करावे लागते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक आहे कारण हे सर्टिफिकेट न दिल्यास पेन्शन तात्पुरती स्थगित केली जाते.

जे पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरतात, त्यांची पेन्शन तात्पुरती रोखली जाते. शासनाचा हा नियम पेन्शनच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांना शासनाने दिलासा दिला आहे. अशा सुपर सीनियर सिटिझनना 30 नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

आता पेन्शनधारकांना बँक किंवा कार्यालयात न जाता घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. शासनाने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट प्रणाली सुरू केली आहे. यासाठी jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून “Get Certificate” या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक आणि PPO क्रमांक भरून बायोमेट्रिक स्कॅन करावा लागतो. पडताळणीनंतर सर्टिफिकेट आपोआप संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसकडे पाठवले जाते.

सरकारने (government)उपलब्ध करून दिलेल्या UMANG App द्वारे देखील पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करता येते. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर हे ॲप विनामूल्य उपलब्ध आहे. या ॲपमध्ये “Jeevan Pramaan” असा पर्याय निवडून आधार आणि PPO क्रमांक टाकल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करावी लागते. पडताळणी पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट तयार होते आणि ते थेट बँकेकडे जमा होते.

हेही वाचा :

नवी दिल्ली ते पुणे तंदूरकांड ते भट्टीकांड

अजित पवारांना झटका काँग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप

झापूक झुपूक सूरज चव्हाण ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात! लग्नाची तारीख आली समोर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *