बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी झालेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत दुर्दैवी अपघात घडला. शर्यतीच्या उत्साहात अचानक बैल बुजल्याने तीन ते चार बैलगाड्या नियंत्रण सुटून धावपट्टीबाहेर गेल्या आणि त्यात एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली. या भीषण अपघातात(accident) अंबाजी शेखू चव्हाण (वय ६०, रा. बुद्देहाळ, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले आहेत.

सकाळपासून हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत शर्यतींना सुरुवात झाली होती. मात्र आदत गटातील शर्यतीदरम्यान अचानक एक बैल बुजला आणि काही क्षणातच मैदानात गोंधळ उडाला. उधळलेल्या बैलगाड्यांनी वेग घेतल्याने प्रेक्षकांमध्ये पळापळ झाली. त्याच वेळी रस्त्याकडेला चहा घेत उभे असलेले अंबाजी चव्हाण यांना पाठीमागून एका बैलगाडीने जोरदार धडक दिली.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर (accident)संपूर्ण मैदानावर शोककळा पसरली आणि शर्यत तात्काळ थांबवण्यात आली.
या दुर्घटनेत नईम आयुब पठाण (रा. पुलब्री, संभाजीनगर), भारत जयसिंग गवळी (रा. चिंचणी, ता. तासगाव), शाहीब हजरत मुजावर (रा. जैनापूर, ता. शिरुर), संतोष चौगुले (रा. कोल्हापूर), सचिन शिरगावकर व नितीन पाटील (दोघेही रा. कोपरडे, ता. करवीर), अजित व आयुष वागवे (दोघेही रा. जाठरवाडी) आणि करण राजमाने (रा. इचलकरंजी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात तसेच मिरज येथे उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे बैलगाडी शर्यतींच्या सुरक्षेच्या नियमांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :
‘या’ राज्यातील बँक राहणार बंद…RBI न का दिली 11 नोव्हेंबरला बँकांना सुट्टी
एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद
पात्र असूनही ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन थांबणार?