गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरात उकडीचे मोदक केले जातात.(wrapper)कोमल आवरण आणि गोडसर सारण असलेला हा गोड पदार्थ बाप्पाचा अत्यंत आवडता मानला जातो. मोदक बनवण्यासाठी प्रथम खोबरे, गूळ, वेलची, जायफळ, खसखस आणि सुकामेवा वापरून सारण तयार केले जाते. त्यानंतर तांदळाच्या पिठाची उकड करून त्यातून मोदकांचे आवरण बनवले जाते आणि सारण भरून त्यांना सुंदर आकार दिला जातो. शेवटी मोदक वाफवून गरमागरम साजूक तुपासोबत सर्व्ह केले जातात. मात्र, तुम्हाला तांदळाच्या पीठापासून तयार केलेले मोदक मीट जमत नसतील आणि फुटत असतील तर तुम्ही रव्यापासून तांदळाच्या पीठाप्रमाणेच मोदक तयार करु शकतात. पाहूयात हे आवरण तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागते.

साहित्य
सारणासाठी लागणारे साहित्य
1 मोठा चमचा खसखस
1 मोठा चमचा साजूक तूप
2 मोठे चमचे सुकामेव्याचे तुकडे (बदाम आणि काजू)
2 कप खोवलेलं ओलं खोबरं
1 कप गूळ
1/2 चमचा वेलची पूड
1/4 चमचा जायफळाची पूड
आवरण
1 कप पाणी
1/2 कप दूध
1 मोठा चमचा तेल
1.5 कप रवा
चवीनुसार मीठ
केशर
कृती
सर्वप्रथम मध्यम आचेवर खसखस भाजून घ्या आणि वेगळी काढून ठेवा. त्याच पॅनमध्ये तूप घालून सुकामेवा सोनेरी होईपर्यंत भाजा. त्यानंतर खोवलेले खोबरे घालून सात-आठ मिनिटे मंद आचेवर परता. (wrapper)खोबऱ्याचा रंग बदलू नये याची काळजी घ्या. आता गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत शिजवा. गॅस बंद करून त्यात वेलची पूड, जायफळ पूड आणि भाजलेली खसखस मिसळा. हे सारण थंड होऊ द्या.

उकड तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी, दूध आणि तेल घालून उकळी आणा. मिश्रणाला उकळी आल्यावर आच कमी करून त्यात रवा आणि चिमुटभर मीठ घाला. पटकन ढवळून गॅस बंद करा आणि झाकून पाच मिनिटे ठेवा. त्यानंतर उकड एका ताटात काढून हाताला तेल लावून मऊसर होईपर्यंत मळा. पीठ जो पर्यंत पुर्ण मऊ होत नाही तोपर्यंत मळत राहा.
मोदक बनवण्यासाठी उकडेतून छोटा गोळा घेऊन त्याची पातळ कडांची पारी तयार करा. कडांवर पाकळ्या तयार करून तयार सारण भरून मोदक बंद करा. सर्व मोदक तयार झाल्यावर पातेल्यात पाणी उकळून वाफवणी तयार ठेवा. केळीचे पान किंवा स्वच्छ कपडा घालून त्यावर मोदक मांडून प्रत्येकावर केशर ठेवा. आठ ते दहा मिनिटे मध्यम आचेवर वाफवा.(wrapper) गरमागरम उकडीचे मोदक साजूक तुपासह सर्व्ह करा. या मोदकांची चव अगदी तांदळाच्या पीठापासून तयार केलेल्या मोदकाप्रमाणेचं लागते.
हेही वाचा :
शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या