आजकाल आरोग्याबाबत(health) जागरूकता वाढल्याने लोक आपले रोजचे अन्न अधिक विचारपूर्वक निवडू लागले आहेत. बहुतांश घरांमध्ये गव्हाची चपाती, रोटी किंवा फुलके नियमितपणे खाल्ले जातात, तर काहीजण ज्वारी किंवा बाजरीच्या भाकऱ्यांना प्राधान्य देतात. या सर्व धान्यांमध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असले तरी त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामात फरक असतो. त्यामुळे शरीरासाठी गहू, ज्वारी की बाजरी — यापैकी कोणते अधिक फायदेशीर आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो.

गव्हाची चपाती ही भारतीय आहारातील अविभाज्य भाग मानली जाते. यात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन बी सारखे पोषक घटक आढळतात. ही चपाती शरीराला ऊर्जा देण्याचे उत्तम साधन आहे. मात्र, गहू ग्लूटेनयुक्त असल्याने ज्यांना ग्लूटेन इनटॉलरेंस किंवा पोटाचे विकार आहेत, त्यांनी गव्हाचे सेवन मर्यादित ठेवावे. अशा व्यक्तींमध्ये गहू खाल्ल्याने गॅस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.
ज्वारीची भाकरी ही ग्लूटेनमुक्त आणि पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानली जाते. ज्वारीत फायबर, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पचन सुधारतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. मधुमेह असणाऱ्यांसाठी ज्वारी विशेषतः उपयुक्त ठरते. तसेच तिचे सेवन केल्याने जास्त वेळ पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हिवाळ्याच्या काळात बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि फायबरने समृद्ध असलेली बाजरी हृदयाच्या आरोग्यासाठी(health) चांगली असते. बाजरीचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
सर्व गोष्टींचा विचार करता, ज्यांना पोटाचे विकार किंवा ग्लूटेनसंबंधी तक्रारी आहेत त्यांनी गव्हाच्या ऐवजी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी निवडणे अधिक आरोग्यदायी ठरेल. मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची प्रतिक्रिया वेगळी असते, त्यामुळे आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा :
उद्धव ठाकरेंचा अजितदादांना मोठा धक्का, ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग
सांगली जिल्ह्यातील विटा येथील भावाच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या गरोदर महिलेचा वेदनादायी अंत
11,000 रुपये वाचवा, OnePlus 13 वरील Amazon ऑफर जाणून घ्या