राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (elections)जवळ आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांमध्ये पक्षांतराची लाट उसळली असून, अनेक नेते आणि पदाधिकारी नव्या समीकरणांच्या शोधात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत.

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अलीकडेच महायुतीमध्ये प्रवेश केला असून, याचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना बसला आहे. विशेषतः या दोन्ही पक्षांतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत नव्या राजकीय समीकरणांना चालना दिली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी, पक्षप्रवेशाची ही मालिका अद्याप सुरूच आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटानेही मोठा राजकीय पलटवार केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडला. शिवसेना शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी देखील ठाकरे(elections) गटात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा विकास अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे, विशेषतः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.
तसेच, महायुतीमध्येही भाजपकडे मोठी इनकमिंग लाट पाहायला मिळत आहे.
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने, शिंदे गट आता अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसतो आहे.याचदरम्यान साताऱ्यातही एक मोठा राजकीय उलटफेर घडला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सगळ्या घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी निवडणुकांपूर्वी नव्या राजकीय समीकरणांचा खेळ सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा :
11,000 रुपये वाचवा, OnePlus 13 वरील Amazon ऑफर जाणून घ्या
पुढच्या वर्षी सोन्याचे दर काय असतील? जाणून घ्या संभाव्य किंमती
निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप! करुणा मुंडेंची मनोज जरांगेंना ‘ती’ मोठी ऑफर!