हिवाळ्यात शरीराला उष्णता, ऊर्जा आणि पोषणाची गरज जास्त असते. अशा वेळी खजूर (Dates)हा नैसर्गिक आणि स्वादिष्ट पर्याय ठरतो. बाजारात विविध प्रकारचे खजूर उपलब्ध असतात, जे स्वाद आणि गुणवत्तेच्या दृष्टीने वेगळे असतात. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, 100 ग्रॅम खजूरात 7 ग्रॅम फायबर, 2 ग्रॅम प्रथिने, तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज, लोह आणि व्हिटॅमिन बी6 भरपूर प्रमाणात असते.

खजूराचे सेवन पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे तसेच नैसर्गिक ऊर्जा प्रदान करते. हिवाळ्यात खजूर खाण्यामुळे शरीराची उष्णता वाढते, थंडीपासून संरक्षण मिळते आणि थकवा कमी होतो. याशिवाय, त्यातील अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्वचेचे आरोग्य सुधारतात आणि हाडे मजबूत करतात.
खजूर सेवन करण्याचे सोपे मार्ग:
दुधासह खजूर: दुधात खजूर उकळवून प्यायल्यास शरीराला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि नैसर्गिक उर्जा मिळते.
खजूराचे लाडू: बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया अशा विविध बियांबरोबर लाडू तयार करता येतात.
पाण्यात भिजवून सेवन: रात्री दोन-तीन खजूर पाण्यात भिजवून सकाळी खाल्यास पचनास मदत होते आणि पोषकद्रव्ये चांगली शोषली जातात.
शेक किंवा स्मूदी: खजूर शेक किंवा स्मूदी बनवून गोडपणा नैसर्गिकरीत्या मिळतो, साखरेवर अवलंबित्व कमी होते.
मिष्टान्नात वापर: खजूर केक, खीर, फिरनी किंवा दह्यासह खाल्यास गोडाची गरज नैसर्गिकरीत्या भागते.
हिवाळ्यात दररोज २-३ खजूराचे (Dates)सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते, ऊर्जा टिकते आणि थंडीतून होणारी सुस्ती दूर होते. खजूर हे नैसर्गिकरीत्या गोड, आरोग्यदायी आणि शरीराला ताजेतवाने ठेवणारे फळ आहे.

हेही वाचा :
अभिषेक शर्माने टी-२० मध्ये घडवला इतिहास!
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर
सुत दरात वाढीची शक्यता! कापूस दर तेजीत, वस्त्रउद्योग सावध